Tv9 स्पेशल रिपोर्ट | उद्धव ठाकरे यानी ‘हा’ उमेदवार देत शिंदे गटाविरोधात टाकला पहिला डाव, पाहा Video

| Updated on: Mar 10, 2024 | 9:45 PM

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंकडून राज्यभर दौरे सुरु आहेत. दरम्यान धाराशिवच्या सभेत ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी घोषीत केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून अमोल किर्तीकरांनाही उमेदवारी जाहीर केलीय. अमोल किर्तीकरांना उमेदवारी देऊन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाविरोधात आपला पहिला डाव टाकलाय.

Tv9 स्पेशल रिपोर्ट |  उद्धव ठाकरे यानी हा उमेदवार देत शिंदे गटाविरोधात टाकला पहिला डाव, पाहा Video
uddhav thackeray
Follow us on

मुंबई : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबईमधून उद्धव ठाकरे यांनी अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर केलीय. दरम्यान यानंतर संजय निरूपम यांनी आपली उघडउघड नाराजी व्यक्त करून दाखवलीय. तर उद्धव ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी योग्यरितीनं पार पाडणार असल्याचं अमोल किर्तीकरांनी म्हटलंय.

अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मविआत वादाची ठिणगी पडलीय. मविआच्या जागावाटपाची यादी जाहीर न होता ठाकरेंनी उमेदवार कसा दिला? असा सवाल काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी उपस्थित केलाय. संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकरांवर गंभीर आरोप देखील केले आहेत. खिचडी घोटाळ, आणि ईडी चौकशी सुरू असताना देखील उमेदवारी दिल्याचं निरूपम यांनी म्हटलंय. दरम्यान निरूपम यांनी केलेल्या आरोपांनंतर विरोधकांनी देखील मविआवर टीकास्त्र डागलंय.

पाहा व्हिडीओ:-

दरम्यान ज्या उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिलीय. त्या मतदारसंघाचे 2019च्या निकालातील आकडे काय होते. 2019 उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन किर्तीकरांविरोधात काँग्रेसचे संजय निरूपम मैदानात होते. संजय निरूपम यांना 5 लाख 69 हजार 18 मतं मिळाली होती. तर संजय निरूपम यांना 3 लाख 9 हजार 557 मतं मिळाली होती. जवळपास 2 लाख 59 हजार 501 मतांच्या फरकानं किर्तीकरांचा विजय झाला होता. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा येतात. यात गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, डिंडोशी आणि अंधेरी पूर्व.

सध्या गोरेगावमध्ये भाजपच्या विद्या ठाकूर या आमदार आहेत. वर्सोवात भाजपच्या भारती लव्हेकर,अंधेरी पश्चिममध्ये भाजपचे अमित साटम, जोगेश्वरी पूर्वमध्ये ठाकरे गटाचे रवींद्र वायकर, डिंडोशीमध्ये ठाकरे गटाचे सुनिल प्रभू तर अंधेरी पूर्वमध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आमदार आहेत. अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिल्यामुळे संजय निरूपम देखील नाराज आहे. या मतदारसंघातून निरूपम यांनी 2019मध्ये जवळपास 3 लाख मतदान घेतलं होतं. तसंच या मतदारसंघात जेवढी शिवसेनेची ताकद तेवढीच ताकद भाजपची देखील आहे. त्यामुळे या मतदारसंघातून बाजी कोण मारणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणारय.