Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : वसंत मोरेंनी का केला वंचितला जय महाराष्ट्र, प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? पाहा Video

| Updated on: Jul 06, 2024 | 12:16 AM

वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिलीय. 9 जुलैला वसंत मोरे मातोश्रीवर शिवबंधन बांधणार आहेत. वंचितला रामराम ठोकल्यानंतर वसंत मोरेंनी आरोप केलेयत. वंचितच्या काही लोकांनी लोकसभेत काम केलं नसल्याचं मोरेंनी म्हटलंय. पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : वसंत मोरेंनी का केला वंचितला जय महाराष्ट्र, प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? पाहा Video
Follow us on

मनसेनंतर वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीला देखील रामराम ठोकलाय. 9 जुलैला वसंत मोरे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर ठाकरे गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देताना वसंत मोरेंनी वंचितवर गंभीर आरोपही केलेयत. दरम्यान आयाराम गयारामांच्या राजकारणावर बोलत नसल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मोरेंवर पलटवार केलाय. ठाकरे गटात पक्ष प्रवेश निश्चित झाल्यानंतर वसंत मोरेंनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी देखील सुरु केलीय. खडकवासला किंवा हडपसर विधानसभेसाठी इच्छूक असल्याचं वसंत मोरेंनी म्हटलंय.

राजकारणात नेते पक्षांतर करतात.. तसंच आपली भूमिका बदलतात.. अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंच्या निर्णयानंतर संजय राऊतांनी दिलीय. मनसेलाही जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरेंनी राज ठाकरेंसह पक्षातील काही पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. अनेकांनी पुण्यातून माझा निगेटीव्ह अहवाल दिला होता तसंच राज ठाकरेंनी बोलण्यासाठी वेळ दिली नसल्याचा आरोप वसंत मोरेंकडून करण्यात आला होता. बोलण्यासाठी राज ठाकरेंनी मला वेळ दिली नव्हती.

पाहा व्हिडीओ:-

 

वंचित बहुजन आघाडीला सोडल्यानंतर वसंत मोरे आता ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे वसंत मोरेंवर कोणती जबाबदारी देणार? तसंच वसंत मोरे पुण्यातून विधानसभा निवडणूक लढवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणारय.

मनसेला जय महाराष्ट्र करत वसंत मोरे यांनी वंचितमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वसंत मोरे यांनी वंचितकडून निवडणूक लढवली होती. पुण्यात तिरंगी लढत होणार अशी चर्चा झाली खरी पण त्याचा फारसा परिणाम काही मतदानामध्ये दिसला नाही. पुण्यात भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे निवडणुकीला उभे होते. मात्र मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवला.