मुंबई : शरद पवारांचं नाव घेत, पहाटेच्या शपथविधीवरुन फडणवीसांनी गौप्यस्फोट केला. मात्र याहून मोठा धमाका करण्याचा इशारा फडणवीसांनी दिलाय. तर फडणवीसांनी पवारांचं नाव घेवूनही अजित पवार बोलण्यास तयार नाही.
पहाटेच्या शपथविधीवरुन जो गौप्यस्फोट फडणवीसांनी केला त्यावरुन राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडालीय. त्यातच आणखी मोठा धमाका करण्याचा इशारा फडणवीसांनी दिलाय. अर्धच बोललो, लवकरच पूर्ण बोलणार असं फडणवीस म्हणालेत.
देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं नाव घेत, tv9च्या कार्यक्रमात गौप्यस्फोट केला. अजित पवारांसोबत शपथविधीआधी पवारांची संमती होती, असं फडणवीस म्हणालेत. शरद पवारांनी तर हा दावा फेटाळला. त्यामुळं अजित पवार काय बोलतात याकडे नजरा होत्या. पण आपण पहाटेच्या शपथविधीवर काहीही बोलणार नाही, असं अजित पवार म्हणालेत.
अजित पवारांना याआधीही अनेकदा पत्रकारांनी प्रश्न विचारले. पण पहाटेच्या शपथविधीवर बोलणार नाही, असंच अजितदादा म्हणतायत. आताही फडणवीसांनी शरद पवारांचं नाव घेतल्यावरही दादा शांतच आहेतआताही शांतता का ?, याच उत्तर दादांनी मौन बाळगल्यानं मिळत नाहीय.
अजित पवार बोलत नसले तरी फडणवीसांनी मात्र लवकरच पूर्ण बोलणार असल्याचं सांगून, राष्ट्रवादीच्या गोटात आणखी चलबिचल सुरु केलीय.