Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : जे.पी. नड्डांनीच पक्षप्रवेश दिला, खडसेंचा दावा तरीही इशारा, पाहा Video

| Updated on: Sep 02, 2024 | 9:22 PM

भाजपच्या पक्षप्रवेशावरुन खडसेंनी मोठा गौप्यस्फोट केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांच्याच उपस्थित आपला प्रवेश झाला. मात्र काही नेत्यांच्या विरोधामुळं घोषणा झालेली नाही. त्यामुळं आता लवकरच ठरवणार, असं खडसे म्हणालेत. वाचा TV9 चा स्पेशल रिपोर्ट.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : जे.पी. नड्डांनीच पक्षप्रवेश दिला, खडसेंचा दावा तरीही इशारा, पाहा Video
Follow us on

भाजपमध्ये पक्षप्रवेश ऑलरेडीच झाल्याचा दावा आणि त्याचवेळी एकनाथ खडसेंनी भाजपला इशाराही दिलाय. दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, विनोद तावडेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झालेलाच आहे. त्याचे फोटोही नड्डांनी काढलेत. मात्र महाराष्ट्रातील काही नेत्यांचा विरोध झाला, त्यामुळं अधिकृत घोषणा झालेली नाही, अशा स्थितीत भाजपमध्ये राहणं योग्य नाही असं खडसे म्हणालेत.

भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर 23 ऑक्टोबर 2020मध्ये खडसेंनी शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला. अजित पवारांच्या बंडानंतर, खडसे शरद पवारांसोबत राहिलेत. शरद पवारांनी खडसेंना विधान परिषदेवर आमदारही केलं. आपण, पवारांकडे राजीनामाही पाठवला पण त्यांनी स्वीकारला नाही. त्यामुळं आणखी काही दिवस वाट पाहणार, नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच काम करणार हेही खडसेंनी स्पष्ट केलं. तर खडसेंचा निर्णय लवकरच होईल आणि ते भाजपसोबतच राहतील असं सूचकपणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणालेत.

पाहा व्हिडीओ:-

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं खडसेंच्या सून रक्षा खडसेंनाच पुन्हा तिकीट दिलं. एकनाथ खडसेंनीही आपला पाठींबा रक्षा खडसेंनाच जाहीर केला. रावेरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील उमेदवार असतानाही खडसेंनी भाजपचंच काम केलं. भाजपकडून अद्याप खडसेंना ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. भाजपकडून निरोप आला नाही तर, शरद पवारांच्याच राष्ट्रवादीसोबत काम करेन हेही खडसेंनी सांगितलंय. त्यामुळं 2-3 दिवसांत खडसे फूल अँड फायनल करणार असल्याचं कळंतय.