‘मेरे साथ मेरी मां है’; अजित पवारांनी दिवार सिनेमाचा डायलॉग का मारला?

| Updated on: May 07, 2024 | 9:16 PM

लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असताना चक्क सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीच्या घरी आल्या. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत असतानाच सुप्रिया सुळे दादांच्या घरी अचानक का आल्या. पाहा टीव्ही९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट.

मेरे साथ मेरी मां है; अजित पवारांनी दिवार सिनेमाचा डायलॉग का मारला?
Follow us on

बारामतीत मतदान सुरु असतानाच, सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानी आल्या. त्यामुळं भुवया उंचावणं स्वाभाविक आहे. मात्र आपण अजित पवारांच्या भेटीसाठी नाही. तर अजित पवारांच्या आई आशा काकूंच्या भेटीसाठी आल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ज्यावेळी, सुप्रिया सुळे घरी आल्या. त्यावेळी अजित पवारही घरीच होते. मात्र आपली अजित पवारांशी भेट झालेली नाही. तसंच आशा काकींचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. तर अजित पवारांनीही अधिक न बोलताना आपल्याला माहिती नाही तसंच मी घरी नव्हतोच अशी प्रतिक्रिया दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, ही भेट म्हणजे भावनिक स्टॅटर्जी असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे या भेटीआधी अजित पवारांनी काटेवाडीतच मतदान केलं. आणि मतदानासाठी पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवारसह आई आशा पवारही उपस्थित होत्या. आईला हात पकडून अजित पवारांनी मतदान केंद्रापर्यंत आणलं आणि मतदानानंतर, अजित पवारांनी दिवार सिनेमाचा डायलॉग मारला, मेरे साथ मेरी मां है.

पाहा व्हिडीओ:-

भाजपसोबत गेल्यापासून अजित दादांची डायलॉगबाजी सुरु असल्याचं अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार म्हणालेत. त्यातच दोन्ही भावांमध्ये मिशीच्या वक्तव्यावरुनही जुगलबंदी रंगलीय. बारामतीच्या निवडणुकीत प्रचारात अजित पवार एकटे पडल्याचं चित्र होतं. सुनेत्रा पवारांनाच, सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभं केल्यानं दादांच्या सख्ख्या भावांनीही साथ दिली नाही. श्रीनिवास पवारांनी सुप्रिया सुळेंचा प्रचार केला. आणि भावांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. मात्र, आईला सोबत असल्याचं दाखवून मां मेरे साथ है असा संदेश अजित पवारांनी सुप्रिया सुळेंसह आपल्या भावांनाही दिलाय.