Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | लोकसभेला आयात, विधानसभेला स्वगृहात? पाहा व्हिडीओ

| Updated on: Aug 17, 2024 | 10:09 PM

लोकसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत ऐनवेळी ज्या दोन नेत्यांचे पक्षप्रवेश होवून उमेदवारी घेतली होती. ते पराभवानंतर पक्षात निष्क्रीय झाल्याची चर्चा आहे.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | लोकसभेला आयात, विधानसभेला स्वगृहात? पाहा व्हिडीओ
Follow us on

शिरुरचे आढळराव पाटील आणि धाराशीवच्या अर्चना पाटलांचा अजित पवार गटातला प्रवेश फक्त लोकसभेपुरताच होता का? अशा चर्चा झडू लागल्या आहेत. कारण शिरुर मतदारसंघातल्या अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेतच आढळराव पाटील गैरहजेर राहिले. यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दुसरीकडे धाराशीवच्या अर्चना पाटील देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीत सक्रीय दिसत नाहीयत. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर त्यांच्या सोशल मिडिया फ्लॅटफॉर्मवर राष्ट्रवादीशी निगडीत कोणतीही पोस्ट नाहीय.

याउलट आढळरावांच्या संपर्ककार्यालयाबाहेर अजूनही शिवसेनेचे नेते म्हणूनच पाटी आहे. तर दुसरीकडे अर्चना पाटील यांच्या फेसबूक कव्हर पेजवरुन घड्याळ, अजितदादांचा फोटो गायब झाल्याचं दिसतंय. शिवाजी आढळराव शिंदेंच्या शिवसेनेत होते. मात्र महायुतीत शिरुरची जागा अजित पवारांना गेली. आणि अजित पवारांच्या गटात प्रवेश करुन आढळराव उमेदवार बनले. मात्र त्यांचा पराभव झाला.

तिकडे धाराशीवची भाजपकडे असलेली जागा अजित पवारांना सोडण्यात आली. भाजपात असलेले राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश करण्यात आला. त्यानंतर त्यांनाच अजित पवार गटानं उमेदवारी दिली., पण त्यांचाही दारुण पराभव झाला. माहितीनुसार आढळराव पाटील लोकसभेतल्या पराभवापासून नाराज आहेत. ते पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरु शकतील तसं झाल्यास शिवसेनेतली ही त्यांची दुसरी घरवापसी असेल.

पाहा व्हिडीओ:-

2004 आधी आढळराव राष्ट्रवादीत होते, 2004 ला शिवसेनेत गेले. शिंदेंच्या बंडानंतर 2022 ला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. 2024 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पाय ठेवला. आणि आता पुन्हा त्यांना शिंदेंच्या शिवसेनेते वापसीचे वेध लागल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः अजित पवारांनी धाराशीवची जागा लढवण्याची इच्छा नव्हती. मात्र तरी सुद्दा ती जागा देण्यात आल्याचं म्हटलं होतं.

दुसरीकडे प्रचारादरम्यानच आपण राष्ट्रवादीचा प्रचार का करु, असं खुद्द राष्ट्रवादीच्याच उमेदवार अर्चना पाटलांनी म्हटल्यामुळे वादही झाला होता. त्यानंतर उमेदवार राष्ट्रवादीच्या असूनही त्यांनी फक्त मोदींचाच फोटो लावल्यानं टीका झाली. त्यावर अर्चना पाटलांच्या बॅनरवर अजित पवारांचाही फोटो अॅड झाला. मात्र पराभवानंतर राष्ट्रवादीशी निगडीत कोणताही फोटो त्यांच्या सोशल मीडियाच्या खात्यांवर दिसत नाहीय. त्याउलट लाडकी बहिण योजनेचं श्रेय घेण्यात अजित पवारांचा गट आघाडीवर असताना अर्चना पाटलांनी मात्र लाडकी बहिण योजनेची माहिती देताना भाजपचा फोटो टाकला आहे.