Maharashtra Exit poll 2024 : शरद पवार, ठाकरेंकडून महायुती ‘चेकमेट’, महाराष्ट्रात अजितदादांचा सुपडा साफ?; एक्झिट पोलचा अंदाज काय?

| Updated on: Jun 01, 2024 | 8:28 PM

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. Tv9 पोलस्ट्राट एक्झिट पोलमध्ये धक्कादायक आकडेवारी दिसून आली आहे. अजित पवारांना तर खातंही खोलता येणार नसल्याचं आकडेवारीमध्ये दिसत आहे.

Maharashtra Exit poll 2024 : शरद पवार, ठाकरेंकडून महायुती चेकमेट, महाराष्ट्रात अजितदादांचा सुपडा साफ?; एक्झिट पोलचा अंदाज काय?
अजित पवार, शरद पवार
Follow us on

देशातील लोकसभा निवडणुकीमधील मतदानाचे सर्व टप्पे पार पाडले असून एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत आहेत. महाराष्ट्राधील दोन मोठे पक्ष ज्यामधील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी बंड करत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय भाजपला फायद्याचा ठरलेला दिसत नाहीय. टीव्ही9 च्या पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुफडा साफ झाल्याचं दिसत आहे. कारण अजित पवार गटाने लढलेल्या पाच जागांपैकी एकही जागा मिळाली नसल्याचं आकडेवारी आहे. तर शिंदे यांनाही अपेक्षेपेक्षा कमी यश आलेलं दिसत आहे.

Tv9 पोलस्ट्राटच्या एक्झिटपोलनुसार महायुतीला २२ आणि मविआला २५ जागा मिळणार असल्याचं एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे. तर महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक १८ तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ४ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नसल्याचं पोलमध्ये म्हटलं आहे. तर मविआमध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक १४, काँग्रेस ५ आणि शरद पवार गटाला ६ जागा मिळणार असल्याचं पोलमध्ये सांगण्यात आलं आहे.

महायुती असूनही म्हणावा असा फायदा काही झालेला दिसत नाही.  एकनाथ शिंदे यांनी लढवलेल्या 15 जागांपैकी अवघ्या ४ जागा येण्याचा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. तर राष्ट्रवादीमधून बाहेर पडत बंड करणाऱ्या अजित पवारांना जनतेने एकही जागा त्यांनी दिली नसल्याचं पोलमध्ये दिसून आलं आहे. अजित पवारांनी पाच जागा  लढवल्या होत्या,  यामधील एकही जागा त्यांना मिळणार नसल्याने सुफडा साफ झाला आहे.

दरम्यान. एकनाथ शिंदेंच्या बंडाचा मोठा काही परिणाम झालेला दिसला नाही. कारण या पोलमध्ये दिलेल्या आकडेवारीमध्ये मविआमध्ये ठाकरे गटाने सर्वाधिक १४ जागा दाखवत आहे. त्यामुळे ठाकरेंना बंडाचा कोणताही तोटा होणार नसल्याचं दिसत आहे.