मुंबई : विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये जुगलबंदी रंगली. आधी अजित पवारांनी तुफान फटकेबाजी करत शिंदेंना चांगलचे चिमटे काढले होते. पण शिंदेंनीही आपल्या स्टाईलनं समाचार घेतलाय. पाहुयात
विधानसभेत अजित पवारांनी शिंदेंना ज्याप्रकारे डिवचलं होतं. त्याची उत्तर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. कसब्यात भाजपच्या पराभवानंतर फडणवीस-शिंदेंच्या रोड शोवरुन आणि आयोगाच्या निर्णयावरुन अजित पवारांनी बदला घेतल्याचं म्हटलं होतं. त्यावर शिंदेंनी आपल्या उत्तरातून सिक्सर मारला.
एसटीवरील जाहिरातीचा फोटो भर सभागृहात दाखवून अजित दादांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर आता शिंदेंनी गतीमान महाराष्ट्र करणार असं सांगत, माझं कुटुंब, माझी जबाबदारी या ठाकरे सरकारच्या जाहिरातीवरुन टोला लगावला.
अजित पवारांबरोबरच, मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंच. कसब्यातल्या काँग्रेसच्या विजयावर बोलणं म्हणजे, बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना, अशी टीका शिंदेंनी केलीय. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना, अजित पवारांनी शिंदे फडणवीसांना चांगलेच टोले लगावले होते पण शिंदेंनी 24 तासांच्या आत परतफेड केलीच.