मुंबई : ”हू इज धंगेकर” या शब्दात केलेली टीका चंद्रकांत पाटील यांचा पिच्छा सोडत नाहीय. निवडणूक जिंकल्यानंतर रविंद्र धंगेकर पहिल्यांदा सभागृहात आले. यावेळी काँग्रेस आमदारांनी चंद्रकांत पाटलांच्या टीकेला उत्तर म्हणून ”हू इज धंगेकर” अशा घोषणा दिल्या. पाहूयात.
कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस झालीत. मात्र हू इज धंगेकर हा प्रश्न चंद्रकांत पाटलांचा पिच्छा सोडत नाहीय. सभागृहात चिंचवडच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप आणि कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकरांचा शपथविधी झाला.
धंगेकर शपथ घेण्यासाठी मंचावर आल्यानंतर काँग्रेस आमदारांनी हू इज धंगेकर ही इज धंगेकरच्या घोषणा दिल्या. प्रचारावेळी भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी हू इज धंगेकर हा शब्द वापरला होता. 5 वेळा नगरसेवक राहिलेले आणि बहुतांश कसब्यावासियांना परिचित असलेल्या रविंद्र धंगेकरांवर
हू इज धंगेकर म्हणून टीका करणं भाजपवरच बूमरँग झालं.
निकालानंतर याच वाक्याचं बॅनर थेट चंद्रकांत पाटलांच्या कोल्हापुरातही लागलं. चंद्रकांत पाटलांची टीका ही धंगेकरांच्या प्रचाराची स्लोगन सुद्धा बनली. पाटलांच्या त्या प्रश्नावर धंगेकर आता नम्रपणे उत्तर देतायत तर चंद्रकांत पाटलांनी हू इज धंगेकर या टीकेवर मौन बाळगणं पसंत केलंय.