राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 2 वर्धापन दिनाचे कार्यक्रम झाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन मुंबईत झाला. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अहमदनगरमध्ये साजरा झाला. इकडे मुंबईतल्या षण्मुखानंदमध्ये झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून, अजित पवारांनी शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
अजित पवारांनी, आपल्याच पक्षातल्या एका आमदारांवर शंका उपस्थित केलीय. कोणताही तरी आमदार आतली माहिती बाहेर पुरवतो. नौटंकी चाललीय, अशा शब्दात दादांनी खडेबोलही सुनावलेत. विशेष म्हणजेच अजित पवारांनी आणखी एक मोठा दावा केलाय. सध्या NDAकडे 293 खासदार आहेत. पण संसदेच्या अधिवेशनानंतर NDAचा आकडा 300 पार होणार, असं दादा म्हणालेत. त्यामुळं आता कोण फुटणार अशी चर्चा सुरु झालीय.
केंद्रातल्या मंत्रिपदावरुनही दादांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलंय. शिंदेंच्या शिवसेनेला स्वतंत्र प्रभाराचं 1 राज्यमंत्रिपद मिळालं. त्याचप्रकारे आपल्यालाही राज्यमंत्रिपद मिळालं होतं. पण कॅबिनेट न मिळाल्यानं नकार दिल्याचं अजित पवार म्हणालेत. तर लोकसभा निवडणुकीत जो फटका बसला. त्याला मराठा आरक्षण किंवा मराठा आंदोलन जबाबदार आहे असं नाही, असं भुजबळ म्हणालेत. खरं तर एक दिवसाआधीच अजित पवारांनी मराठा आरक्षणाचा फटका बसल्याचं अजित पवार म्हणाले. पण विदर्भात मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्हता मग तिथंही सारखाच परिणाम झाल्याचं भुजबळांचं म्हणणंय.