मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काडतूस म्हटल्यापासून संजय राऊतांनी डिवचणं सुरु केलंय. शिंदे आणि त्यांच्या आमदारांना लक्ष्य करणाऱ्या राऊतांनी आता फडणवीसांनाही टार्गेट केलंय. अंडरवर्ल्डप्रमाणं शिंदे आणि फडणवीसांच्या टोळ्या असल्याची टीका राऊतांनी केलीय. पाहुयात
उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांनी काडतूसने उत्तर दिलं आणि राऊतांनी भिजलेली काडतूसं म्हणत फडणवीसांना डिवचणं सुरु केलंय. दादा भूसे आणि राहुल कूल यांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्र दिली असून, फडणवीसांनी त्यांच्यावर काडतूस फेकावीत असं राऊत म्हणालेत.
राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय. सरकार नसून गुंडांना पाठीशी घालणं सुरु आहे. अंडरवर्ल्ड प्रमाणं शिंदे आणि फडणवीस टोळ्या चालवतात अशी जोरदार टीका राऊतांनी केलीय. त्यानंतर राऊतांना गिरीश महाजनांनी जोकर म्हटलंय. काडतूस वरुनच नारायण राणेंनी पत्रकार परिषदेतून राऊतांवर टीका केली होती. त्यावरुन पुन्हा राणे आणि संजय राऊत आमनेसामने आलेत.
राऊत रोज सकाळी शिंदेंची शिवसेनेवर तुटून पडतात. पण ठाण्यातल्या मारहाणीच्या घटनेवरुन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फडतूस गृहमंत्री म्हटलं आणि इथूनच फडतूस, काडतूसवरुन सामना रंगला.