मुंबई : वांद्र्या्च्या पोटनिवडणुकीचा दाखला देत, अजित पवारांनी राणेंवर बोचरी टीका केली होती. त्यानंतर नारायण राणे चांगलेच संतापलेत. राणेंनी अजित दादांना थेट पुण्यात येऊन बारा वाजवण्याचा इशारा दिलाय. पाहुयात
अजित पवारांनी अगदी अॅक्शन करुन, केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर बोचरी टीका केली होती. शिवसेना सोडणाऱ्या राणेंना वांद्र्यात बाईनं पाडलं, म्हणत अजित दादांनी राणेंना डिवचलं होतं. त्या टीकेला आता राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. राणेंनी थेट अजित दादांचे बारा वाजवण्याचा इशारा दिलाय.
अजित पवार आणि नारायण राणे आत्ताच आमनेसामने आलेत असं नाही. महाविकास आघाडी सरकार असतानाही अजित दादांनी लघू आणि सुक्ष्म म्हटल्यानं दोघांमध्ये खटके उडाले होते. काही दिवसांआधीच नितेश राणेंनाही अजित पवारांनी टिल्ल्या म्हटलं होतं.
चिंचवडमध्ये अजित पवारांनी केलेल्या टीकेनंतर राणेंनी दादांनाही प्रत्युत्तर दिलं. तर उद्धव ठाकरेंनाही नवा इशारा दिलाय. शिंदे गटाच्या आमदारांना खोक्यांवरुन डिवचतात, पण ठाकरेंचे खोके घेतानाच्या कॅसेट्स आपल्याकडे असल्याचं राणे म्हणतायत.
राणे आणि ठाकरे कुटुंबीयांमधला राजकीय सामना सर्वऋुत आहेत.आता नव्या आरोपांप्रमाणे राणेंकडे नेमक्या कोणत्या कॅसेट्स आहेत ते त्यांनाच माहित.