Tv9 स्पेशल रिपोर्ट : पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत केलेली चूक भाजप टाळणार?, गिरीश बापट यांच्या घरातच देणार उमेदवारी?

| Updated on: Apr 07, 2023 | 11:59 PM

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी किमान वर्षभर शिल्लक असल्यानं या मतदारसंघात निवडणूक लागणार आहे. त्यामुळं भाजप या पोटनिवडणुकीत कुणाला तिकीट देणार? कसब्यातल्या पराभवाची पुनरावृत्ती भाजप टाळणार का?

Tv9 स्पेशल रिपोर्ट : पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत केलेली चूक भाजप टाळणार?, गिरीश बापट यांच्या घरातच देणार उमेदवारी?
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

पुणे : गिरीश बापट यांच्या निधनामुळं पुणे लोकसभेची जागा रिक्त झालीय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी किमान वर्षभर शिल्लक असल्यानं या मतदारसंघात निवडणूक लागणार आहे. त्यामुळं भाजप या पोटनिवडणुकीत कुणाला तिकीट देणार? कसब्यातल्या पराभवाची पुनरावृत्ती भाजप टाळणार का?

खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीत भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापट यांना 6 लाख 32 हजार 835 मतं मिळाली तर काँग्रेसच्या मोहन जोशी यांना 3 लाख 8 हजार 207 मतं मिळाली. गिरीश बापट यांना काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा दुप्पट जास्त मतं मिळाली.

गिरीश बापट यांचा स्वत:चा करिष्मा होता. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळं आताही त्यांच्याच सुनेला म्हणजेच स्वरदा बापट यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यत आहे. भाजपकडून सध्या स्वरदा बापट, माजी खासदार संजय काकडे आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावांची चर्चा सुरु आहे

महाविकास आघाडीत पुण्याची जागा ही काँग्रेसकडे आहे. त्यामुळं काँग्रेसच ही जागा लढवणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी आधीच स्पष्ट केलंय. कसब्यातल्या विजयामुळं काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलाय. त्यामुळं निवडणूक लागलीच तर काँग्रेस रविंद्र धंगेकरांनाच लोकसभेची उमेदवारी देऊन राजकीय खेळी करण्याची शक्यता आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा परंपरागत मतदार त्यांच्यापासून दूर गेला. ब्राह्मण समाजाला नाकारलं गेल्याची तीव्र भावना मतदारांमध्ये होती. त्याचा फटका भाजपला बसला. त्यामुळं पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप ती चूक सुधारण्याची शक्यता आहे. बापट यांच्याच घरात उमेदवारी मिळाली तर निवडणूक बिनविरोध होण्याचीच दाट चिन्ह आहेत.