ब्रिजभान जैसवार, प्रतिनिधी, मुंबई : सीएसएमटी ते पनवेल लोकलमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार झालेत. तरुणी हार्बर रेल्वेने बेलापूर येथे जात होती. लोकलमधील तरुणीवर अत्याचार होणं ही अतिशय संतापजनक घटना आहे. महाराष्ट्रातील गुन्हेगारांना कायदाची भीती राहिली नाही. असं ट्वीट अत्याचाराच्या घटनेवर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केलंय. गृहखात्याची निष्क्रयेता या सर्व घटनेला कारणीभूत आहे, असा आरोप त्यांनी केला.
ट्वीटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, संतापजनक, चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आलाय. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही. याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. असं ट्वीत सुप्रिया सुळे यांनी केले.
संतापजनक!
चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे.यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता…— Supriya Sule (@supriya_sule) June 15, 2023
मुंबईत परीक्षेला जात असताना चालत्या लोकल ट्रेनमध्ये एका 20 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. प्रवाश्याने याची माहिती रेल्वे पोलिसांना देताच पोलिसांनी 4 पथक तयार केली. आरोपी नवाजू करीम याच्या मुसक्या आवळल्या. बुधवारी सकाळी ही विद्यार्थिनी सकाळी 7 वाजून 26 मिनिटांच्या CSMT-पनवेल लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या महिला डब्यात प्रवास करण्यासाठी एक विद्यार्थिनी बसली होती.
ट्रेन सुरू होताच आरोपी नवाजू करीम डब्यात चढला. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. विद्यार्थिनीने आरडाओरडा करत स्वतःला बचाव करण्याचा प्रयत्नही केला. ट्रेन मस्जिद रेल्वे स्थानकावर येताच विद्यार्थिनी ट्रेनमधून उतरून स्वतःचा बचाव केला. एका पुरुष प्रवाश्याने जीआरपी हेल्पलाईन नंबर 1512 ला फोन करून माहिती दिली.
जीआरपी आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने आरोपी नवाजू करीमला मस्जिद येथून 4 तासांत अटक केली. पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मस्जिद बंदर या ठिकाणी हार्डवेअर दुकानात हमालीचे काम करतो. आरोपी मूळचा बिहार राज्यातील किशनगंज येथील रहिवासी आहे. अशी माहिती लोहमार्ग पोलीस उपायुक्त महेश पाटील यांनी दिली आहे.