एकाच दिवशी जन्म, एकत्र भरती, एकत्र ट्रेनिंग आणि एकाच आजाराने घात, जुळ्या पोलीस भावांचा कोरोनाने मृत्यू

| Updated on: Jul 31, 2020 | 9:12 AM

पोलीस दलातील जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.

एकाच दिवशी जन्म, एकत्र भरती, एकत्र ट्रेनिंग आणि एकाच आजाराने घात, जुळ्या पोलीस भावांचा कोरोनाने  मृत्यू
Follow us on

ठाणे : एकाच दिवशी जगात पहिले पाऊल ठेवलेल्या जुळ्या भावंडांचा एकाच आजाराने बळी घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ठाणे पोलीस दलातील जुळ्या भावांचा अवघ्या आठ दिवसांच्या अंतराने कोरोनामुळे मृत्यू झाला. एकत्र भरती, एकत्र ट्रेनिंग असा प्रवास एकत्र केलेल्या या भावांचा करुण अंतही सारखाच झाला. (Thane Police Twin Brothers Died of Corona)

दिलीप घोडके आणि जयसिंग घोडके या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिलीप आणि जयसिंग हे दोघेही एकाच दिवशी पोलीस दलात भरती झाले होते. दिलीप घोडके हे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात, तर जयसिंग घोडके हे अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत होते.

घोडके बंधू 2023 मध्ये एकाच दिवशी निवृत्तही झाले असते. मात्र नियतीला कदाचित ते मान्य नव्हतं. आठ दिवसांपूर्वी 20 जुलै रोजी दिलीप घोडके यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर 28 जुलै रोजी जयसिंग यांची प्राणज्योत मालवली, ती कोरोनामुळेच.

हेही वाचा : आधी नितीन गेला, आता सचिनही गेला, PSI भावांवर काळाचा घाला

अवघ्या आठ दिवसांच्या फरकाने या दोघांचाही कोरोनाने बळी घेतला, त्यामुळे साहजिकच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा दुहेरी डोंगर कोसळला आहे. यामुळे पोलीस दलातही मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

याआधी, मुंबईतील विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन दिनकर पाटील यांचं 9 जुलै रोजी कोरोनामुळे निधन झालं होतं. धक्कादायक म्हणजे सचिन पाटील यांचा भाऊ नितीन हे देखील पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाले होते. नाशिक इथे प्रशिक्षिण सुरु असताना काही दिवसांपूर्वी त्यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला होता.