ट्वीटर शब्द मर्यादा वाढविणार 280 ऐवजी 4000 कॅरेक्टरचा वापर करता येणार

| Updated on: Dec 12, 2022 | 6:49 PM

ट्विटरने आता ट्वीटची 280 शब्दांची मर्यादा दूर करुन ती वाढवली आहे. नव्या बदलानुसार ट्विटरवर तब्बल 4000 कॅरेक्टरचा वापर करीत मोठा लेखही युजर्सला लिहिता येणार आहे.

ट्वीटर शब्द मर्यादा वाढविणार 280 ऐवजी 4000 कॅरेक्टरचा वापर करता येणार
elon-musk
Image Credit source: elon-musk
Follow us on

मुंबई : मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर (Twitter) वर अनेक बड्या मंडळी लिहीत असल्याने ट्वीटर नेहमीच चर्चेत असते. या वेबसाईटवर आपल्या भावना मोजक्याच शब्दात व्यक्त करण्याचे बंधन आता हटणार आहे. आता ट्वीटरने आपल्या शब्द मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतल्याने वापरकर्त्यांना 280 कॅरेक्टर ऐवजी 4000 कॅरेक्टरमध्ये आपल्या भावना मांडता येणार असल्याचे ट्विटरचे सीईओ दस्तुरखुद्द इलॉन मस्क यांनी म्हटले आहे.

मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर अनेक कारणांमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे. शब्दमर्यादा ही त्यातील एक अडचण होती. त्यामुळे वापरकर्त्यांना मोजक्या शब्दात जास्त आशय मांडावा लागत असायचा. कमी शब्दात जास्त आशय लिहिण्यासाठी इंग्रजी भाषेवर ज्याचे जास्त प्रभुत्व आहे, तिच मंडळी या प्लॅटफॉमचा वापर करीत असायची व ज्यांना जास्त मोठा संदेश लिहायचा आहे, त्यांची अडचण होत असायची त्यामुळे ही मंडळी फेसबुकचा वापर करायची. जगातील प्रसिद्ध आणि काही मोजके लोकच ट्विटरवर सराईतपणे वापरायचे. ज्यांना कमी शब्दात जास्त आशय सांगता येत असे तोच ट्विटरवर फॉलोअर्स मिळवत असे.

ट्विटरवर व्यक्त होताना बहुतांश लोक ट्विटर पोस्ट करताना शब्दाचे भान बाळगणून व्यक्त हाेत असत. ज्यांना अधिक आशय मांडायचा आहे. त्यांना अनेक ट्वीटद्वारे तो आशय मांडावा लागत असे. ट्वीट केल्यानंतर थ्रेडचा वापर करावा लागत असे. त्यामुळे ट्विटची संख्याही वाढत असायची.

तसेच ट्वीटर आता ब्ल्यू टिकसाठी पैसेही आकारणार आहे. 12 डिसेंबर पासून ट्विटर आपल्या वापरकर्त्यांकडून सबस्क्रिपशन चार्ज आकारणार आहे. अन्ड्रॉइड मोबाईल वापरकर्त्यांना 8 डॉलर म्हणजेचं जवळजवळ 659रुपये तर आयफोन वापरकर्त्यांना 11 डॉलर म्हणजे 907  रुपये सबस्क्रीपशन फी द्यावी लागणार आहे. तरी तुम्ही ट्विटर वापरकर्ते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. तरी हे सब्सक्रीप्शन चार्जेस केवळ ट्विटर ब्लू टीक धारकांना द्यावे लागणार आहे. जर तुम्ही तुमचं ट्विटर खात्यावर जे आहे तेचं नाव आहे. त्या नावात किंवा डीपीत  काही बदल केल्यास किंवा नाव एडिट केल्यास तुम्हाला तुमची ब्लू टिक गमवावीही लागू शकते.