रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज (गुरुवारी) दोन तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पनवलेजवळ दिशादर्शक फलक बसवण्यात येणार असल्याने हा बंद घेण्यात आला आहे. दुपारी 12 ते 2 या दरम्यान हा बंद असेल. यावेळी पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद असेल. बंद दरम्यान पुण्याकडे जाणारी बाहतूक ही कळंबोली बायपासमार्गे वळवण्यात येणार आहे. या दोन तासांत मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांचे हाल होणार आहेत.
या आधीही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक दोन वेळा बंद करण्यात आली होती. आता पुन्हा एक्स्प्रेस वे वरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कळंबोली बायपासमार्गे पुण्याकडे जाणाऱ्या बसेस किंवा इतर वाहने वळवण्यात येणार आहेत. एक्स्प्रेस वेवरील देखभालीसाठी ही वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान बंद घेण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही याची जबाबदारी तेथील वाहतूक पोलिसांनी घेतली आहे.
एक्स्प्रेस वेवर कमानी उभारण्यात येणार आहे. या कमानी दरम्यान रस्ता बंद करणे गरजेचे असते. आज सकाळी सहा वाजल्यापासून या मार्गावरील जड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. तर इतर वाहनांना दुपारी 12 नंतर बंदी असेल. पुण्याकडे येण्यासाठी कळंबोली सर्कल-उरण बायपास, रोड-टी पॉईंट-पळस्पे फाटा- कोन गावा मार्गावरुन येता येणार आहे. या बंदची वाहनचालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.