मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 48 वर पोहोचला आहे. मुंबईतील दोन महिलांना कोरोनाची (Mumbai corona positive) लागण झाल्याची माहिती आज सकाळी समोर आली. त्यानंतर आता नगर जिल्ह्यातील नेवासामधील एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. (Corona in Maharashtra) हा व्यक्ती दुबईवरुन आला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोनवर पोहोचली आहे.
दरम्यान, मुंबई आणि उल्हासनगरमधील प्रत्येकी एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील 22 वर्षीय महिला इंग्लंडवरुन परतली आहे. तिला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. तर उल्हासनगरमधील 49 वर्षीय महिला दुबईवरुन आली असून, तिला सुद्धा कोरोनाची बाधा झाली आहे. (Mumbai corona positive)
Maharashtra Health Ministry: A 22-yr-old woman tested positive for #COVID19 in Mumbai; has travel history to United Kingdom. One more person, a 49-year-old woman from Ulhasnagar tested positive today; has travel history to Dubai. Total no. of positive cases reaches 47 in state. pic.twitter.com/5yMVzlaSMD
— ANI (@ANI) March 19, 2020
त्याआधी काल रत्नागिरीत नवा कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Corona Patient found Ratnagiri) असल्याचं दिसत आहे. पुणे, मुंबई, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर, कल्याण या ठिकाणी कोरोनाचे रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नुकतंच रत्नागिरीत कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 45 वर पोहोचली होती. त्यामध्ये आणखी दोन महिलांची वाढ झाल्याने हा आकडा 47 वर पोहोचला. दुबईतून रत्नागिरीत आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाली आहे. कोकणातील हा रुग्ण 50 वर्षाचा आहे. त्यामुळे कोरोनाने कोकणातही शिरकाव केला आहे.
दुबईहून रत्नागिरीला परत आलेल्या एका प्रौढ व्यक्तीला ‘कोरोना’ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णाचा अहवाल बुधवारी रात्री सव्वानऊ वाजता रत्नागिरीत थडकला आणि आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली. विमानतळावर तपासणी झाली त्यावेळी तो ‘कोरोना’ग्रस्त नसल्याचा अहवाल देण्यात आला होता, ही बाबच चिंताजनक ठरत आहे.
संबंधित रुग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी भागातील आहे. ते दुबईमध्ये नोकरी करतात. ‘कोरोना’च्या थैमानामुळे ते दुबईहून परत आले. विमानतळावर त्यांची तपासणी झाली, मात्र ते कोरोनाग्रस्त नसल्याचा अहवाल देण्यात आला. तिथून ते शृंगारतळीला आले.
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?
विमानतळावर निगेटिव्ह रिपोर्ट, रत्नागिरीच्या रुग्णाला ‘असे’ झाले कोरोनाचे निदान
पुण्यात कोरोनाग्रस्त वाढले, ‘फ्रान्स रिटर्न’ महिलेला लागण
शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी, रेल्वे, बसेसमध्ये प्रवासी क्षमता कमी करणार : मुख्यमंत्री