आनंदाच्या मैत्रीवर दुःखाची लाट…; मित्रा-मित्रांची मौजमस्ती ठरली अखरेची…

| Updated on: Mar 12, 2023 | 9:11 PM

होळीच्या शेवटच्या दिवशी आणि रविवार असल्याने मौजमज्या करण्यासाठी गेलेल्या मित्रांनी समुद्रावर पाण्यात खेळण्याचा मजा लुटली मात्र निघतानाच दोन मित्र मात्र गठागंळ्या खाऊ लागले.

आनंदाच्या मैत्रीवर दुःखाची लाट...; मित्रा-मित्रांची मौजमस्ती ठरली अखरेची...
अनैतिक संबंधातून मुलाने केली आईच्या प्रियकराची हत्या
Follow us on

वसई : होळीच्या आजच्या दिवशी एकीकडे रंगपंचमी साजरी होत असतानाच अनेक ठिकाणी बुडून मृत्यूमुखी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावरही आज दोन तरुण बुडाल्याची दुर्देवी घटना होळीदिवशीच घडली आहे. वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर हे दोघं तरुण बुडाल्यानंतर तेथील उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरडाओरड करून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही तरुण लाटेबरोबर सुमद्रात गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.

तरुण बुडाल्याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशामक दलाला दिल्यानंतर तरुणांचा शोध घेण्यात आला. अथक प्रयत्नानंतर एका युवकाचा मृतदेह आढळून आला मात्र दुसऱ्या युवकाचा शोध रात्री उशिरापर्यंत करण्यात येत होता.

वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर बुडालेल्या दोघंही तरुण नालासोपारा पूर्व बिलालपाडा, श्रीराम नगर येथील रहिवासी असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले.

यावेळी मृत पावलेल्या युवकांच्या बरोबर आलेल्या त्यांच्या मित्रांनी सांगितले की, आज रविवारी असल्याने आज फिरण्यासाठी म्हणून चार जण मित्र मित्र समुद्रावर फिरण्यासाठी आले होते. समुद्रावर आल्यानंतर पाण्यात मौजमस्ती करत असताना चार जणांपैकी दोन मित्र समुद्राच्या लाटेबरोबर आत गेले.

समुद्रकिनारी असलेल्या लोकांनी त्या दोन मित्रांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ते पाण्यात बुडाल्यानंतर वसई विरार महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवानाना पाचरण करण्यात आले.

त्यावेळी एकाचा मृतदेह आढळून आला मात्र दुसऱ्याचा शोध रात्री उशिरापर्यंत घेण्यात येत होता. तर बुडालेल्या एकाचा मृतदेह सापडला असून अजून एक जण बेपत्ताच असल्याचे सांगण्यात आले.

ही दोघे ही नालासोपारा पूर्व बिलालपाडा श्रीराम नगर येथील रहिवासी असून मृत युवकांच्या कुटुंबीयांना या घटनेचा मानसिक धक्का बसला आहे. एक जण तरुण बेपत्ता असून त्याचा शोध वसई पोलीस आणि वसई विरार महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.