मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (9 जुलै) पत्रकार परिषद घेऊन अंतिम परीक्षेबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली (Uday Samant and VC on ATKT students Final Exam). यावेळी त्यांनी कुलगुरुंच्या समितीच्या शिफारशींचा संदर्भ देत इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांबाबतही धोरण सांगितलं. यानुसार इतर विद्यार्थ्यांना सरासरी गुण देत पदवी प्रदान करणार आहोत. त्याचप्रमाणे एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही सरासरी गुणांनुसार पास करणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.
LIVETV | एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुणानुसार पास करावे, अशी 13 कुलगुरुंची शिफारस, तो पास होत नसल्यास, ‘कोव्हिड’च्या परिस्थितीत ग्रेस गुणांची पद्धत अवलंबून एटीकेटी सोडवावी : उदय सामंत https://t.co/ImprYhMJl7 @samant_uday pic.twitter.com/tH5sfOuMut
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 9, 2020
उदय सामंत म्हणाले, “राज्यातील कुलुगुरुंच्या समितीने दिलेल्या शिफारशीत म्हटलं, ज्या सूत्रानुसार आपण इतर विद्यार्थ्यांना सरासरी गुण देत पदवी प्रदान करणार आहोत, त्याचप्रमाणे सरासरीनुसार एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना पास करावं अशी शिफारस राज्यातील सर्वच्या सर्व 13 कुलगुरुंनी केली. ही सरासरी काढून विद्यार्थी पास होत नसेल तर त्यांना कोरोनाची परिस्थिती पाहता विद्यापीठाकडून ग्रेस मार्क देऊन एटीकेटीमुक्त करावे, असं सांगण्यात आलं.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“कुलगुरुंच्या समितीने सरकारच्या शासनआदेशात काही बदल करण्याचीही शिफारस केली. याप्रमाणे, विद्यार्थ्यांकडे पर्याय मागण्याऐवजी सर्व विद्यार्थ्यांना पास करुन कोरोनाची परिस्थिती गेल्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांमध्ये सुधारणेसाठी संधी देता येईल. त्यामुळे आम्ही कुलगुरुंशी चर्चा केली नाही असा अपप्रचार चुकीचा आहे. आम्ही या काळात 5-6 वेळी कुलगुरुंशी चर्चा केली. मागील 2 आठवड्यात आम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विद्यापीठांचे प्रश्न सोडवण्याचा उपक्रम सुरु केला आह,” असंही त्यांनी नमूद केलं.
उदय सामंत यांनी यावेळी यूजीसीच्या धोरणावरही सडकून टीका केली. यूजीसीने आधी कोरोनाची स्थिती पाहून राज्य सरकार आणि कुलगुरुंनी निर्णय घेण्यास सांगितले. त्यानंतरच तब्बल 4-5 महिने काहीही सांगितलं नाही. या काळात राज्य सरकारने कुलगुरुंशी चर्चा करुन कोरोनाची गंभीर स्थिती लक्षात घेता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यात लाखो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रामुख्याने विचार करण्यात आला. मात्र, आता यूजीसी अचानक परीक्षा घेण्यास सांगणारे पत्र पाठवत आहे.”
संबंधित बातम्या :
Exam Controversy | परीक्षा रद्द झाल्याच पाहिजे, मंत्री उदय सामंत यांची मागणी
UGC चा निर्णय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा, सप्टेंबरपर्यंत परीक्षा शक्य नाही : उदय सामंत
Uday Samant and VC on ATKT students Final Exam