‘घराणेशाहीवर घरंदाजांनी बोलावं, आमच्यावर बोलू नका, नाहीतर….’; उद्धव ठाकरेंचा थेट PM मोदींना इशारा

| Updated on: Jan 13, 2024 | 1:58 PM

Uddhav Thackeray on PM Modi : उबाठा गटाने नेते उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीवर बोलताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. घरंदाजांनी घराणेशाहीवर बोलावं असं ठाकरे म्हणाले.

घराणेशाहीवर घरंदाजांनी बोलावं, आमच्यावर बोलू नका, नाहीतर....; उद्धव ठाकरेंचा थेट PM मोदींना इशारा
Follow us on

मुंबई :  उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरावर बोलताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. (Uddhav Thackeray on PM Modi) आमच्या घराण्यावर बोलू नका, घरंदाजांनी घराणेशाहीवर बोलावं, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. अंबरनाथ येथील शाखा उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी मोदींनाही इशारा देत शिंदे पिता-पुत्रावरही ठाकरे यांनी जहरी टीका केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

राम मंदिर सोहळा आपल्या देशाची प्राण प्रतिष्ठा आहे. भाजपला आमची घराणेशाही नको पण गद्दारांची घराणेशाही मान्य आहे. शिंदेंच्या घराण्याला उमेदवारी दिली ही माझी चूक, निष्ठावंतांना डावलून त्यांना उमेदवारी दिली ही चूक तुम्ही सुधारा. कल्याण लोकसभा मतदारसंघ आपला बालेकिल्ला असून गद्दारांना गाडणारा हा मतदार संघ असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सभा घेण्यासाठी कल्याण मध्ये जेव्हा येईल तेव्हा शब्दांचा चाबूक घेऊन येणार आहे. संपूर्ण देशात कल्याण लोकसभेवरती एक वेगळी जबाबदारी आहे. आमच्यावर घराणेशाहीवरून टीका केली. मात्र टीका करणारे घरंदाज पाहिजेत. कल्याण लोकसभेत गद्दार यांच्या घराणेशाही थांबवायची जबाबदारी असल्याचं उद्धव ठाकरे  म्हणाले.

दरम्यान, तुम्हाला पाहून आनंद झाला कारण कल्याण लोकसभा मतदार संघ म्हणजे आपली बाप की जायदात, असं काहींना वाटलं होतं. ही  घराणेशाही विधानसभेतच नाहीतर लोकसभेतही घालवायची आहे. आपल्यासोबत सगळे देशभक्त आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित आरपीआयही सोबत आहे. जे जे देशभक्त आहेत ते माझ्यासोबत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.