मुंबईः तब्बल शंभर दिवसानंतर जामीनावर बाहेर आल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आज विविध मुद्यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आंबेडकर आणि ठाकरे या दोन शक्ती एकत्र येतील तर राज्याचे नाही तर देशाचे चित्र बदलेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमामध्ये भेटणार असल्याने त्यांनी भविष्यातील राजकारणाची एक बाजूच स्पष्ट केली.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, ज्या प्रबोधनकार ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बोलवण्यात आले. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरही त्यांच्या हाकेला ओ देऊन ते या चळवळीत सहभागी झाले.
त्याविषयी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी विषयी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी बाबासाहेब आंबेडकर यांची प्रखर मतं आहेत, आणि इतिहासात तशी नोंद असल्याचेही त्यांनी सांगितले.
आणि तशी इतिहासात नोंद असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेबांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी होण्याची विनंती केली होती. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन बाबासाहेब आंबेडकर आले होते ही इतिहासातील त्यांनी घटनाही सांगितली.
त्यामुळे बाबासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे हे आजोबांचं नातं होते आणि ते आहे. त्यामुळे ते आता नातवापर्यंत पोहोचलेला आहे असंही त्यांनी सांगितले.
खासदार संजय राऊत यांनी बोलताना सांगितले की, प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी माझ्या मनामध्ये सदैव आदर राहिला आहे. त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो आंबेडकर ही एक ताकद आहे आणि ठाकरे ही एक ताकद आहे. आणि ही ताकद जर एकत्र येईल तेव्हा महाराष्ट्राचा नव्हे तर देशाच्या राजकारणाचे चित्र वेगळे असेल असंही त्यांनी यावेळी सांगितले.