Uddhav Thackeray : ते राजकारण नाही, गजकरण आहे, उद्धव ठाकरे यांचा सरकारवर तुफान हल्ला

| Updated on: Sep 01, 2024 | 12:30 PM

Uddhav Thackeray Attack on Government : सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याविरोधात महाविकास आघाडीने मुंबईत हल्लाबोल केला. सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तुफान हल्लाबोल केला.

Uddhav Thackeray : ते राजकारण नाही, गजकरण आहे, उद्धव ठाकरे यांचा सरकारवर तुफान हल्ला
उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
Follow us on

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याविरोधात आज राज्यभर महाविकास आघाडीने आक्रोश केला. राज्यात ठिकाठिकाणी राज्य सरकारच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. मुंबईत हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियादरम्यान मोर्चा काढण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्य सरकारवर आगपाखड केली. त्यांनी या घटनेचा संताप व्यक्त केला. हे शिवद्रोही सरकार असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला.

हे तर गजकरण

महाराष्ट्रात जे वातावरण चाललं आहे. त्याला मी राजकारण म्हणायला तयार नाही. पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला. शिवद्रोही मंडळी तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरले. तुम्ही राजकारण करत आहेत असा आरोप आहे. मी म्हणेल ते करतात ते राजकारण नाही. गजकरण आहे.खाजवत बसत आहे. खाजवू द्या त्यांना, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.  याप्रकरणात चुकीला माफी नाही, असे त्यांनी सरकारला ठणकावले. त्यामुळे महाविकास आघाडी आता याविषयीचे आंदोलन तीव्र करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

गेट आऊटचा दिला नारा

आपल्या देशाचं प्रवेशद्वार.. इथे शिवद्रोही सरकार आहे. घटनाबाह्य सरकार आहे. त्यांना सांगूया गेट आऊट ऑफ इंडिया. गेट आऊट, असे उद्धव ठाकरे म्हणाले. म्हणूनच इथे बसलो आहोत. देशाचे पंतप्रधान आले. त्यांनी माफी मागितली. माफी मागितली नसती तर तुम्हाला महारााष्ट्राने ठेवलं नसतं. माफी मागताना त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. ही मग्रुरी मान्य आहे का. माफी मागताना मग्रुरी कसली दाखवता असा घणाघात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. स्टेजवर मुख्यमंत्री बसले होते. सोबत दीड शहाणे, दोन शहाणे होते, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांन लगावला. ते माफी मागत असताना हे सर्वजण हसत असल्याचा गंभीर आरोप पण ठाकरे यांनी केला.

कशा कशाची माफी मागणार?

दिल्लीच्या एअरपोर्टचं छत कोसळतंय, पूल कोसळतंय. कशाकशाची माफी मागणार. महाराजांची माफी मग्रुरीने मागून चालणार नाही. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान आहे. महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे. महाराष्ट्र शिवद्रोहींना कधी माफ करत नाही. करणार नाही. हे दाखवून देण्यासाठी जमलो आहोत. ही जाग आली आहे ती कायम ठेवा. या महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आऊट केल्या शिवाय राहू नका, असा टोला त्यांनी हाणला.