उत्तर प्रदेशमध्ये मंदिरात झोपलेल्या 2 साधूंची हत्या, उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन

| Updated on: Apr 28, 2020 | 4:25 PM

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे मंदिरात झोपलेल्या 2 साधूंची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Murder of two seers in UP).

उत्तर प्रदेशमध्ये मंदिरात झोपलेल्या 2 साधूंची हत्या, उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन
Follow us on

मुंबई : उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे मंदिरात झोपलेल्या 2 साधूंची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Murder of two seers in UP). यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करुन चर्चा केली आहे. तसेच साधुंच्या हत्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

योगी आदित्यनाथ यांच्यासोबत झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी बुलंद शहरात झालेल्या साधुंच्या हत्येबाबत चिंता व्यक्त केली. तसेच अशा अमानुष घटना घडतात तेव्हा राजकारण न करता आपण एकत्र काम करुन गुन्हेगारांना शासन केलं पाहिजे, असं मत व्यक्त केल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली.


दरम्यान, याआधी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात झालेल्या मॉब लिंचिंग प्रकरणानंतर भाजपने शिवसेना आणि राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर भाजपशासित उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी आदित्यनाथ यांना राजकारण न करता दोषींना शिक्षा देण्याचं मत व्यक्त केलं. यातून त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष कानपिचक्या दिल्याची चर्चा आहे.

प्रकरण नेमकं काय?

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यात अनूपशहर परिसरात मंदिरात झोपलेल्या दोन साधूंची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही हत्या गावातीलच एका व्यसनाधीन व्यक्तीने केल्याचं समोर येत आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत तपास सुरुवात केली आहे. पगोना गावातील या घटनेनंतर बुलंदशहर जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर हजर झाले आहेत. अनेकांच्या साक्षी घेतल्या जात आहेत. ताब्यात घेण्यात आलेला आरोपीला भांग घेण्याचं व्यसन होतं.

काही दिवसांपूर्वीच आरोपीने साधूंची चिमटाच चोरला होता. त्यानंतर साधू आणि संबंधित आरोपीमध्ये बाचाबाची झाली होती. त्यावेळी आरोपीने साधूंना याचे परिणाम भोगण्यास तयार राहा, अशी धमकीही दिली होती. आरोपी सध्या नशेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन्ही साधूंची मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली जात आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यातील 102 पोलीस चौकीचं काम पोलीस ठाण्यातून चालणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

राज्यपालांनी फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचा अधिकार वापरला, आता त्यांना मंत्रिमंडळाचं ऐकावं लागेल : पृथ्वीराज चव्हाण

55 वर्षापेक्षा वयस्क पोलिसांना घरीच थांबण्याचे निर्देश, मुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

Murder of two seers in UP