मुंबई, दिनांक 3 जानेवारी 2024 : आगामी लोकसभा निवडणूकीआधी महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष ताकदीने तयारीला लागले आहेत. भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी इंडिया आघाडी देशात काम करत आहे. तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस पूर्ण ताकद लावत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील धारावी येथे झालेल्या सभेमध्ये आम्ही तुमच्यासोबत येतो म्हणत भाजपलाचा आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले जाणून घ्या.
आठवर्षापूर्वी सव्वा लाख कोटीचं पॅकेज मोदींनी बिहारला जाहीर केलं होतं. त्यापैकी किती आले. आले असती तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासबत येतो. मोदींचा फसवी फसवीचा खेळ सुरू आहे. आम्हीही दोनदा मोदींच्या भूलथापांना बळी पडलो. पदरात काय पडलं. धोंडे पडले तरी त्यात त्यांना शेंदूर फासून देव करता येतो. हे काय करणार. यांनी फक्त नावं बदललं. योजनांची नावे बदलली. काही काम केलं नाही. जुमल्याचं नाव गॅरंटी ठेवलं आहे. भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये या तुमचं वाकडं होणार नाही. ही मोदी गॅरंटी असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
पहिल्यांदा आपल्याला दिल्लीचे तख्त फोडावे लागेल. अब की बार भाजप तडीपार घोषणा द्यावी लागेल. हे कसले 400 पार होतो बघतो. गेल्यावेळी महाराष्ट्राने निवडून दिले नसते तर तुम्ही अडीचशेच्या पार गेला नसता. आमचं हिंदुत्व वेगळं आहे. तुमचं वेगळं आहे. आम्ही तुमचं हिंदुत्व मानायला तयार नाही. आमच्यासोबत समाजवादी आले, मुस्लिम येतात. आमचं हिंदुत्व चुल पेटवणारं आहे. तुम्ही पेटवणारे आहे. आमचं हिंदुत्व गाडगेबाबांचं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
काँग्रेसकडे 800 कोटी होते आणि भाजपकडे आठ हजार कोटी मग कुणी देशाला लुटलं. दहा वर्षात एवढे पैसे आले कुठून. जे दहा वर्षात काँग्रेसला जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं हे मोदी बोलतात ते खरं आहे. जनतेला लुटायचं आणि मोठमोठ्या जाहिराती करायच्या. या पैशाचा वापर त्यासाठी करत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.