मुंबई: पूजा चव्हाण प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल. त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. (CM Uddhav Thackeray reaction on sanjay rathod pooja chavan suicide case )
गेल्या काही काळात लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. तसं होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले जाईल. त्यानंतर ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल ती केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.
भाजपने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं या प्रकरणात नाव घेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. या घटनेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विटरवर टॅग करण्यात आलं होतं. यावेळी याप्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती करण्यात आली होती. या विनंतीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याबाबत दखल घेतली आहे.
अरुण राठोड या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पुण पोलिसांकडून सध्या अरुण राठोडचा शोध सुरु आहे. अरुण राठोड हा सध्या बीडमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप याची कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
संबंधित बातम्या:
फोटो स्टोरी: एक होती पूजा! टिकटॉक स्टार ते सामाजिक कार्यकर्ती!
संजय राठोडांबाबत मातोश्रीची कमालीची सावध भूमिका ; भेटीची वेळ मागूनही उद्धव ठाकरेंकडून होकार नाही?
(CM Uddhav Thackeray reaction on sanjay rathod pooja chavan suicide case )