Video | उद्धव ठाकरेंसोबत असले तरी अखेर भास्कर जाधव मनातलं बोलले, पाहा काय म्हणाले…

| Updated on: Mar 10, 2024 | 10:02 PM

आगामी लोकसभा निवडणुकीआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. शिंदे गटात वायकर गेलेत नाहीतर दुसरीकडे ठाकरे गटाची तोफ म्हणून ओळखले जाणाऱ्या भास्कर जाधव यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलूुन दाखवली. पाहा टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

Video | उद्धव ठाकरेंसोबत असले तरी अखेर भास्कर जाधव मनातलं बोलले, पाहा काय म्हणाले...
Follow us on

मुंबई : निवडणुकीआधी इकडे आमदार रवींद्र वायकर शिंदेंकडे गेलेत तर तिकडे कोकणात भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केलीय. आपण ठाकरेंसोबतच राहणार असं सांगत असतानाच आपल्याला अनेकदा डावललं गेल्याचं भास्कर जाधवांनी जाहीरपणे सांगितलं.

एकाच सभेतून ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांनी पक्षातंर्गत नाराजी बोलून दाखवली. याच सभेत शिंदे-भाजपच्या नेत्यांना त्यांनी उत्तरही दिलं. नाराजी मांडतानाच आपण ठाकरेंच्या शिवसेनेशीच एकनिष्ठ राहणार हे देखील सांगितलं मात्र या साऱ्याआडून भास्कर जाधवांनी अप्रत्यक्षपणे शक्तिप्रदर्शन केल्याचं बोललं जातंय. आम्ही जेव्हा गुवाहाटीला गेलो. त्याचवेळी भास्कर जाधवही आमच्यासोबत बॅग भरुन येण्यास तयार होते, असा दावा रामदास कदमांचे पुत्र सिद्धेश कदमांनी केला होता, तो दावा भास्कर जाधवांनी पूर्णपणे फेटाळून लावला.

पाहा व्हिडीओ-:

सिद्धेश कदमांच्या दाव्यांवर उत्तर देताना भास्कर जाधवांचे पुत्र विक्रांत जाधवांनी भाजपच्या मोहित कंबोज यांचं उदाहरण दिलं. 2 वर्षांपूर्वी मोहित कंबोजच्या दाव्यावर भास्कर जाधवांनी जे उत्तर दिलं. त्यावर ते आजपर्यंत पुरावे देऊ शकले नसल्याचं विक्रांत जाधवांनी म्हटलंय. दरम्यान मुलगा विक्रांत जाधव भाषण करत असताना भास्कर जाधवांना रडू कोसळलं. त्यावरुन रामदास कदमांनी जाधवांना बाम लावण्याच्याच्या विधानावरुन सवाल केलाय.

काही दिवसांपूर्वी निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थकांत राडा झाला होता. याप्रकरणी जाधवांच्या अनेक समर्थकांवर गुन्हे दाखल झाले. त्यावेळी पक्षानं दुर्लक्ष केल्याची भावना जाधवांच्या समर्थकांमध्ये असल्याचं बोललं जातंय. शिवाय स्थानिक काही पदाधिकारी आणि ठाकरेंच्या काही नेत्यांबद्दलही जाधवांनी नाव न घेता नाराजी बोलून दाखवली. पण आपण शिंदेंकडे वा भाजपकडे जाणार नाही, हे सांगतानाच पक्षातंर्गत मतभेदांकडे भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंचं लक्ष वेधलंय. या सभेच्या माध्यमातून विरोधकांसह पक्षातंर्गत विरोधकांसाठीही जाधवांनी शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा आहे.