मुंबई : हल्ल्याच्या सुपारीचे जे आरोप संजय राऊत यांनी केले होते, त्याच आरोपांवरुन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते आता राऊतांवर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. कारण राऊतांनी केलेले आरोप आणि त्यांनी नोंदवलेल जबाब यात विसंगती असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. आपल्यावर हल्ला होणार असल्याच्या दाव्यानंतर संजय राऊत यांना तीन पोलीस कर्मचारी आणि एक कार देण्यात आली आहे.
मात्र राऊतांनी त्यांच्यावर हल्ला होण्याचा जो दावा केला होता, त्यावरच शिंदेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेत आता राऊतांवरच गुन्हा दाखल करण्याची तयारी केलीय. राऊतांनी काल जे विधान केलं, आणि प्रत्यक्षात जो जबाब नोंदवला त्यातच विसंगती असल्याचं नरेश म्हस्केंनी म्हटलंय.
दुसरीकडे संजय राऊत सुरक्षेची गरज नसल्याचं सांगून सरकारवर टीका करतायत.तर मनाविरुद्ध घडल्यावर निराक्षेचे झटके येतात, त्यामुळे राऊतांनी काळजी घ्यावी असं उपरोधिक पत्र मनसेच्या संदीप देशपांडेंनी लिहिलंय.
दरम्यान माध्यमांपुढे हल्ल्याचा दावा करुन राऊतांनी जबाबात शाईफेकीची शक्यता का वर्तवली. असाही प्रश्न निर्माण होतोय., नरेश म्हस्केंच्या या दाव्यावर आता संजय राऊत काय भूमिका मांडतात, याची प्रतीक्षा आहे.