मुंबई | 17 मार्च 2024 : शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्यापुढे निर्माण झालेल्या एकेएक अडचणी कमी होत नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवता आले असते, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली होती. त्यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांच्या पक्षातील नेते अंबादास दानवे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद मिळाले. परंतु आता दानवे यांचे हे पद धोक्यात आहे. कारण शिवसेना उबाठाचे विधान परिषदेतील आमदार आमश्या पाडवी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहे. आमश्या पाडवी आता शिंदे गटात जात आहे. त्यामुळे विधान परिषदेतील उद्धव ठाकरे गटाची संख्या एकाने कमी झाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ जास्त झाले आहे.
विधान परिषदेतील ठाकरे गटाच संख्याबळ कमी होत आहे. सध्या ठाकरे गटाकडे 7 आमदार आहे. तसेच त्यामधील 3 आमदारांचा कार्यकाळ जुन आणि जुलैमध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांचे विरोधी पक्ष नेते पद धोक्यात आले आहे. सध्या काँग्रेसचे 8 आमदार आहेत. त्यापैकी 2 आमदारांचा कार्यकाळ येत्या जुलै महिन्यात संपत आहे.
हे ही वाचा
उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बड्या नेत्यांना बाजूला करत बनवले आमदार, आता शिंदे गटात जाणार