मुंबई : राज्यात नवी समीकरणे अस्तित्वात येऊन महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन झाल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांचं कौतुक होत होतं. कारण अनैसर्गिक युती कशी घडून आली? आणि विचारांनी वेगळे असणारे पक्ष एकत्र कसे आले? असा सवाल सर्वांच्याच मनात पडला होता. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार यांच्यातला दुवा म्हणून काम करणारे संजय राऊत गेल्या अडीच वर्षात रोज हेडलाईन मध्ये आहेत. आता राज्यातलं ठाकरे सरकार गेलं आणि एकनाथ शिंदे सरकार आलं, एकनाथ शिंदे यांचा बंड देशभर गाजलं. आताही संजय राऊत रोज हेडलाईनमध्ये आहेत. पण आता ते वेगळ्या कारणासाठी आहेत. आधी विरोधकांवर टीकेचे बाण चालवणारे संजय राऊत हेडलाईनमध्ये असायचे, आता शिवसेना आमदारांच्या टीकेचे बाण सोसणारे संजय राऊत चर्चेत आहेत. आज विजय शिवतारे यांनीही संजय रावतांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सज्जन व्यक्ती आहेत. मात्र संजय राऊत यांनी शिवसेनेचे वाटोळं केला आहे. असा घाणाघात शिवतारे यांनी संजय राऊतांवर केलाय. आज नाशिकमध्ये जाऊन संजय राऊत बोलले, पण तिथे गुलाबराव पाटील त्यांना प्रतिउत्तर द्यायला आहेत. काय ते संजय राऊत यांचे बोलणं, आमदार गेल्याने काय फरक पडतो? म्हणतात… आदित्य ठाकरेंना ते सध्या मिसगाईड करत आहेत. आदित्य ठाकरेंना गोवा निवडणूक लढायला गोव्यात घेऊन गेले आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत आणि तिथे प्रचार केला मात्र नोटा पेक्षाही कमी मत पडली. अशी सडकून टीका विजय शिवतारे यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या निवडणुका लढायला घेऊन गेले, तिकडेही काय झालं हे सर्व जनतेने पाहिला आहे असेही ते म्हणाले.
तोंडाची वाफ असणारी माणसं काय असणार? असे म्हणत त्यांनी संजय राऊत त्यांच्या बोलण्यालाही टारगेट केलं आहे. या बंडाला संजय राऊत जबाबदार आहेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितलं आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड झाल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या गोटातील प्रत्येक आमदार हा संजय राऊत यांच्या बद्दल तक्रार करतोय. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे बऱ्याच गोष्टी बिघडल्या. तसेच आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याशी थेट संपर्क साधता येत नव्हता. त्यांच्या आजूबाजूची लोक आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नव्हती. दुसरीकडे राष्ट्रवादी आम्हाला पुरेसा निधी देत नव्हती. त्यामुळेच हे बंड झालं आहे, असेही आमदारांनी वेळोवेळी सांगितलं आहे. मात्र या सर्व आमदारांचे टार्गेट हे संजय राऊत हेच राहिलेले आहेत.