सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असणारा पूर्णाकृती पुतळा कोसळला. त्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरे यांच्या घरी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्र्वादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाविकास आघाडी या घटनेकडे गांभीर्याने पाहात आहे, तसंच येत्या रविवारी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेन, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
वाऱ्याने पुतळा पडला हे कारण निर्लज्जपणाचा कळस गाठणारे आहे. राज्यपाल कोश्यारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला होता. पण कोश्यारींची टोपी वाऱ्याने उडाली असं कळलं नाही. गद्दार केसरकर म्हणाले, चांगलं घडेल. आम्ही असं ठरवलं दुपारी ११ वाजता हुतात्मा स्मारकाला वंदन करून. गेटवेला शिवाजी महाराजाचां पुतळा आहे. तो पुतळा मजबुतीने उभा आहे. आम्ही या पुतळ्यासमोर जमणार आहोत आणि सरकारला जोडे मारो आंदोलन करू. मी आहे तिथे. पवारसाहेब असतील नाना पटोले असतील. सर्व शिवप्रेमींनी यावं अशी विनंती आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातलं सरकार हे महाफुटीचं सरकार आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. कारभाराने किळस आणली आहे. आम्ही तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंद केला होता. पण कोर्टाच्या माध्यमातून त्यावर बंदी घातली होती. मालवणमध्ये पुतळा कोसळला. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा करण्यता आला. त्या मोर्चात मोदी आणि शहांचे दलाल आणि शिवद्रोही आले. ते शिवद्रोही आहेत, असं उद्धव म्हणाले.
गुन्हा दाखल करणार असाल तर गुन्हा घडला हे मान्य आहे. मग गुन्हेगार कोण. मोदी आले त्यांच्या हस्ते अनावर झालं. त्यांचा संबंध आला. नौदल आपलं एवढं पोकळ आहे का. ते समुद्राशीच खेळत असतात. ही जबाबदारी नौदलावर टाकून मोकळे होणार आहे का. किती वेगाने वारे वाहणार हे नौदलाला माहीत नव्हतं. का. निवडणूका होत्या. कोकण जिंकायचं यासाठी हा घाट घातला, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं.