वक्फ बोर्डावरुन उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल केला. महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा मुंबईत झाला. त्यात त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला. त्यात केंद्र सरकारच्या वक्फ बोर्डाबाबतच्या निर्णयालावरुन त्यांनी कान टोचले. यावेळी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे विधेयक आणा असे चॅलेंज मोदी सरकारला दिले. आरक्षण मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्यांना नाही, तो केंद्र सरकारला असल्याचा टोला पण त्यांनी यावेळी लगावला.
मग आजच निवडणूक घ्या
अयोध्येतील जमीन कोणाला दिली,. कोणत्या ट्रस्टला दिली याची चौकशी करा. आमच्या हाती घंटा. केदारनाथ मधून सोनं चोरीला गेलं. त्याचीही चौकशी करा. मोदींचं काही चालत नाही म्हणून उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारत आहेत. म्हणूनच म्हणतो आजच निवडणुका घ्या, असे खुले आव्हान त्यांनी दिले.
आरक्षणाची मर्यादा वाढवा
तुम्ही वक्फ बोर्डाचं बिल आणलं. जाहीर विचारतो. महाराष्ट्रात तुम्ही जी समाजात आग लावली. मराठा, ओबीस आणि धनगर आरक्षण आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्यांचा नाही. तो केंद्र सरकारचा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊन ही मर्यादा वाढवा. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचं बिल आणा. मराठ्यांना आरक्षण द्या, धनगरांना द्या. ओबीसींचं तसंच ठेवा. आणा बिल. आम्ही देतो पाठिंबा. पण तुम्ही आगी लावत आहात. म्हणूच तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. एक तर तू राहशील किंवा मी राहील, असे ते पु्न्हा म्हणाले.
मुस्लीम समाजाने मतदान केले
राज्यात आणि देशात हे समाजासमाजात आगी लावत आहे. निवडणुकीत मुस्लिम आणि बौद्धांनी भरभरून मतदान केलं. त्यांनी आपल्याला मतदान केलं. तर कोरोना काळात आपण जे काम केलं, त्यांना आपण वाचवलं. त्यामुळे मतदान केलं. भयभीत वातावरण झालं होतं. त्यामुळे लोकांनी मतदान केलं. मी केंद्राला एकही वाकडं पाऊल उचलू देणार नाही. एकाही नागरिकाला इथून जाऊ देणार नाही, असं मी म्हटलं. त्यामुळे मुस्लिमांनी मतदान केलं, असे ते म्हणाले.
आम्ही वेडंवाकडं होऊ देणार नाही
आमच्यात आगी लावण्यासाठी वक्फ बोर्डाचं बिल का आणलं. हिंमत होती तर बहुमत असताना मंजूर का नाही केलं. नोटबंदी तुम्ही आम्हाला विचारून करत होते? तुम्ही नोटबंदी करून निघून गेला. आज बहुमत असताना तुम्ही वक्फ बोर्डाचं विधेयक का मांडलं. मी दिल्लीत होतो म्हणून माझे खासदार संसदेत नव्हते. तुम्ही वक्फ बोर्डाच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या घशात घालत असाल तर… वक्फ बोर्ड बाजूला ठेवा. मंदिराची जमीन हडप केली जाते. वक्फ असो किंवा कोणत्याही धर्माच्या जागा असतील त्यात आम्ही वेडंवाकडं होऊ देणार नाही. अजिबात होऊ देणार नाही, जमीन चोरु देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.