गायीवर बोलता महागाईवर का बोलत नाही?; उद्धव ठाकरे यांचा मोदींना खणखणीत सवाल

| Updated on: May 16, 2024 | 7:05 PM

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या महामुलाखतीमध्ये भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. मोदी गायींवर बोलतात मात्र महागाईबाबत का बोलत नाहीत असा सवाल ठाकरेंनी मोदींना केला आहे.

गायीवर बोलता महागाईवर का बोलत नाही?; उद्धव ठाकरे यांचा मोदींना खणखणीत सवाल
Follow us on

नरेंद्र मोदी गायीबद्दल बोलतात पण ते महागाईबाबत का बोलत नाहीत. हा लोकसभेचा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमचीच भाषणं होती, भाई और बहनो मतदानाला जाताना गॅस सिलिंडरला नमस्कार करून जा. आता तुमच्या फोटोला नमस्कार करून जायचं का. गॅस के दाम नीचे गये की उपर गये, डिझेल के दाम उपर गये की नीचे गये असं ते म्हणत होते. तेव्हा मोदीच म्हणायचे की ज्या देशाचं चलन पडतं त्या देशाची अब्रू जाते. आता जर चलन पडलं असेल तर नमस्कार कुणाला करायचा. मोदींनाच नमस्कार केला पाहिजे. बाबा बस झालं आता नको, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपच्या वृत्तीत बदल- उद्धव ठाकरे

दोघांचं हिंदुत्व कसं वेगळं काढू शकता तुम्ही. प्रबोधनकारांचे विचार बाळासाहेबांनी पुढे नेले. तेच मी आणि आदित्य नेत आहे. आम्हाला शेंडी जानव्याचे हिंदुत्व नकोय, देवळात घंटा बडवणारा हिंदु नकोय असं प्रबोधनकार बाळासाहेब म्हणायचे आम्ही तेच म्हणतोय. आमच्या हिंदुत्वात बदल झाला नाही. भाजपच्या वृत्तीत बदल झाल्याचं ठाकरे म्हणाले.

नरेंद्र मोदींनी दहा वर्षाच्या कामावर बोलावं. पीक विमा, हमी भाव का मिळत नाही, मोदी मणिपूरमध्ये का जात नाही, शौर्य आहे तर मणिपूरमध्ये शेपट्या का घातल्या आहेत. चीनने जमीन बळकावली आहे. काश्मीरमध्ये तणाव आहे. अशांत आहे. 370 कलमाचा एक पार्ट काढला. अदानीने जमिनी घेतल्या, त्यावर का बोलत नाही, असा सवालही ठाकरेंनी केला.

२०१४ आणि २०१९ला त्या मुद्द्यावर येतो. जी मोदींनी सांगितलेली कोणती गोष्ट पूर्ण केली? अच्छे दिन आले.. नाही, महागाई कमी झाली… नाही, १५ लाख आले ? नाही… मग कोण खोटं बोलतंय हे लोकांना कळतंय ना. बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शब्द हा जुमला होता. मी शिवाजी पार्कवर आई वडिलांची शपथ घेतली. मी तुळजाभवानीची ही शपथ घेतली. खोटं बोलतं आहेत, हे लोकांना कळेल असं ठाकरेंनी सांगितलं.