उद्धव ठाकरे यांचे मिशन विधानसभा, 36 विधानसभा मतदार संघाची जबाबदारी या नेत्यांवर

| Updated on: Aug 18, 2024 | 3:28 PM

Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला शिव सर्वेक्षण अभियानचा फायदा झाला. त्यामुळे शिवसेना उबाठाला यश चांगले मिळाले. आता येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचा किती फायदा होईल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. परंतु विधानसभेच्या जोरदार तयारीला ठाकरे गट लागला आहे. 

उद्धव ठाकरे यांचे मिशन विधानसभा,  36 विधानसभा मतदार संघाची जबाबदारी या नेत्यांवर
Uddhav Thackeray
Follow us on

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठाला यश मिळाले. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील 42 लोकसभा मतदारसंघातील शिव सर्वेक्षण अभियान केले होते. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे ‘मिशन मुंबई’वर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांची मोर्चेबांधणी करण्यासाठी बैठक बोलावली. त्यात प्रमुख नेते आणि सर्वेक्षणासाठी नेमलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत. मुंबईतील 36 मतदारसंघांची जबाबदारी 18 नेते आणि 18 सहाय्यकांवर सोपवण्यात आली आहे. प्रत्येक नेत्यावर दोन विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षण करण्याची जबाबदारी दिली आहे.

कोणाकडे कोणती जबाबदारी

  1. विनायक राऊत यांच्याकडे वरळी, दादर- माहीम
  2. अनिल देसाई यांच्याकडे जोगेश्वरी आणि अंधेरी
  3. अनिल परब यांच्याकडे मागाठाणे, दहिसर
  4. राजन विचारे यांच्याकडे विलेपार्ले, कालिना
  5. मिलिंद नार्वेकरांकडे दिंडोशी, गोरेगाव
  6. सुनील प्रभू यांच्याकडे मुलुंड, भांडुप
  7. अजय चौधरी यांच्याकडे चेंबूर, अणुशक्तीनगर
  8. सचिन अहिर यांच्याकडे कुलाबा, मुंबा देवी
  9. विलास पोतनीस यांच्याकडे शिवडी आणि मलबार हिल
  10. वरून सरदेसाई यांच्याकडे सायन कोळीवाडा, धारावी

 

मुंबईसह इतर महाराष्ट्रातील सर्वेक्षण अहवाल 25 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांना सादर केले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

विनायक राऊत – वरळी, माहिम

सुनील शिंदे – विक्रोळी, घाटकोपर (पु)

दत्ता दळवी- कुर्ला, चांदिवली

अनिल देसाई- जोगेश्वरी (पु), अंधेरी (पु)

अनिल परब- मागाठाणे, दहिसर

सुनील प्रभू- मुलुंड, भांडूप (प)

अरविंद सावंत- अंधेरी (प), वर्सोवा

राजन विचारे- विलेपार्ले, कलिना

सुनिल राऊत- वांद्रे (पु), वांद्रे (प)

वरुण सरदेसाई- सायन कोळीवाडा, धारावी

मिलींद नार्वेकर- दिंडोशी, गोरेगाव

रमेश कोरगावकर- बोरीवली, कांदिवली

मनोज जामसुतकर – चारकोप, मालाड

अजय चौधरी- चेंबूर, अणुशक्तीनगर

विलास पोतनीस- शिवडी, मलबार हिल

विनोद घोसाळकर- वडाळा, भायखळा

सचिन अहिर- कुलाबा, मुंबादेवी

अमोल कीर्तिकर- , घाटकोपर (प), मानखुर्द-शिवाजीनगर

लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला शिव सर्वेक्षण अभियानचा फायदा झाला. त्यामुळे शिवसेना उबाठाला यश चांगले मिळाले. आता येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचा किती फायदा होईल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. परंतु विधानसभेच्या जोरदार तयारीला ठाकरे गट लागला आहे.