मुंबई: उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्यात अखेर युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनीच त्याची माहिती दिली. जागा वाटपही झालं आहे. आम्ही एकमेकांना कमिटमेंटही दिली आहे. फक्त ही कमिटमेंट चार भिंतीत देण्यात आली आहे. ती अजून पब्लिकली जाहीर झालेली नाही. या युतीची घोषणा कधी करायची? याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनाच घ्यायचा आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या युतीवर भाष्य केलं. युती फायनल करणं उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. आमची शिवसेनेसोबत युती झाली आहे. पण ती पब्लिकली झाली नाही. आम्ही एकमेकांना कमिटमेंट दिली आहे. ही चार भिंतीतील कमिटमेंट आहे. पब्लिकली नाही. चार भिंतीतील ही कमिटमेंट कधी पब्लिकली करायची ते उद्धव ठाकरेंनी ठरवायचं आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर घ्यायचं आहे. त्याला आमची हरकत नाही. दोन्ही काँग्रेसला सोबत घेऊन एकत्र पीसी घेऊ असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे ते थांबले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
मी काँग्रेसला फार चांगलं ओळखतो. माझ्या एवढा काँग्रेस आणि शरद पवारांना ओळखणारा दुसरा नेता नाही. तेव्हा तुम्हाला ते फसवतील, असं मी उद्धव ठाकरे यांना आधीपासूनच सांगत आलो आहे. काल नाना पटोलेंनी वेगळं लढणार असल्याचं पुन्हा सांगितलं. त्यामुळे शिवसेनेने आघाडीसोबत थांबू नये असा मेसेज आम्ही पाठवला आहे, असंही ते म्हणाले.
मी अनेक गोष्टी बोलत नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकांशी खरं खरं बोलावं. मला गमावण्यासारखं काहीच नाही. पण ते खोटच बोलले तर मी जे काही चाललं ते समोर आणेल, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेना आणि वंचितची आघाडी होणार हे स्पष्ट आहे. जागा वाटप राहिलं नाही. तो मुद्दा निकाली निघाला आहे. जागा वाटप झालंय. फक्त जाहीर करायचं बाकी आहे. शिवसेना दोन्ही काँग्रेससोबत आहे. त्यामुळे त्यांना दोन्ही काँग्रेस सोबत पाहिजे.
ते सोबत का येणार नाही ते आम्ही शिवसेनेला सांगत आहोत. निवडणूक तारखा जोपर्यंत घोषित होणार नाहीत तोपर्यंत उद्धव ठाकरे दोन्ही काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न करतील. पण जेव्हा दोन्ही काँग्रेस येणार नाही तेव्हा आमच्यासोबत युतीशिवाय शिवसेनेला पर्याय राहणार नाही, असंही ते म्हणाले. तसे