काही लोकांना वाटत होत समृद्धी महामार्ग होणार नाही, एकनाथ शिंदे यांची टीका

| Updated on: Dec 10, 2022 | 5:24 PM

म्ही तर आलातचं बाकी लोकंपण बाहेर यायला लागलेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी केली.

काही लोकांना वाटत होत समृद्धी महामार्ग होणार नाही, एकनाथ शिंदे यांची टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us on

मुंबई : सीमावादावरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. सीमावादावरील भूमिका मांडा, मग समृद्धी महामार्गाचं उद्धाटन करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना केली. काही जणांना समृद्धी महामार्ग होऊ नये, असं वाटत होतं. मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हा निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे म्हणाले, मी महाराष्ट्र आणि कर्नाटकचा वाद सध्या सुरू आहे. यात कर्नाटकचे मुख्यमंत्री अरेरावी करताहेत. याबद्दल पंतप्रधानांनी बोललं पाहिजे. आता उद्या तुमच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या भूमिकेची वाट बघतोय, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

एका मोठ्या रस्त्याचं उद्धघाटन करत असताना तुम्ही कर्नाटकला काय बोलणार आहात. महाराष्ट्राला काय दिलासा देणार आहात, हे तुम्ही आधी बोला. मग बाळासाहेब ठाकरे यांचं नाव असलेल्या महामार्गाचं उद्घाटन करा, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लोकं पॉझिटिव्ह विचार करत नाही, असं म्हणत असालं तर तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. संकल्पना त्यांची होती. प्रत्येक्षात उतरविण्याचं काम आम्ही केलं.

आज प्रत्येक्षात स्वप्न साकार झालं. काही लोकांना वाटत होतं की,हे होणारचं नाही. होऊचं नये, असं काही लोकं विचार करत होते, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. ज्यांना होणार नाही, असं वाटत होतं, त्यांना काम झालेलं दिसतं.

आधीच्या काळात वेद बोलणारे रेडे होते. आता जे रेडे आहेत ते खोके खोके बोलतात, अशी कोपरखडी उद्धव ठाकरे यांनी केली.

तर, कोविडनंतर आपण सर्व मर्यादा उठवल्या. गोविंदा, गणपती, दिवाळी सर्व सण आनंदात झालं. जे घरामध्ये बसले होते तेही बाहेर आले. तुम्ही तर आलायतचं बाकी लोकंपण बाहेर यायला लागलेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी केली.