मुंबई | 1 March 2024 : महायुत्तीत रायगडच्या जागेवरुन धुसफूस सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी त्यांच्या माजी सहकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद दिलं नसतं तर महाविकास आघाडीचं सरकार आठ दिवसही टिकलं नसतं. मी हा दावा व्यासपीठावर करतो. मी सांगतो. कारण आमदारांच्या मनात दादांचा निर्णय योग्य होता. तीन पक्षाच्या सरकार पेक्षा दोन पक्षाचं सरकार हवं होतं. दादा आणि देवेंद्र जींचं सरकार चांगलं ठरलं असतं हे आमदारांना वाटत होतं. सर्वोच्च न्यायालयाचा हेडकाऊंटचा निर्णय आला नसता तर निकाल वेगळा लागला असता. परिस्थिती वेगळी झाली असती. दादांना उपमुख्यमंत्री केलं नसतं तर आमदारांच्या मनातील स्फोट झाला असता, असा दावा तटकरे यांनी केला.
ती काही मेहरबानी नव्हती
काळ उत्तर देईल
पहाटेची शपथ नव्हीत. ती ८ वाजेची शपथ होती. लख्ख प्रकाशात झाली. काळाच्या ओघात त्याची उत्तरे मिळतील. काळ हेच उत्तर आहे. रहस्य तसंच राहणार. कुटुंबात काय चर्चा झाली हे माहीत नाही. हल्ली लोक फार मोठं समजण्याच्या नावाखाली काहीही बोलतात, असा टोला तटकरे यांनी लगावला.
कर्तृत्व सिद्ध करावं लागतं
पद मिळाल्यामुळे अजितदादा इथवर पोहोचले, असं म्हटलं जातं. पण टेक ऑफ करताना काही तरी लागतं. पण नंतर कर्तृत्व सिद्ध कराव लागतं. 53 पैकी 43 आमदार सोबत येतात हे कर्तृत्व आहे, म्हणूनच आले. त्यांचा विश्वास आहे म्हणूनच आले. त्यांनी असामान्य भूमिका घेतली, म्हणूनच त्यांच्यासोबत गेले अशी त्यांनी दादांची पाठराखण केली.