मुंबईः महाविकास आघाडी आणि घटक पक्षांनी मुंबईत महामोर्चा काढला होता. त्या मोर्चावर टीका करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महामोर्चा नव्हता, तर तो नॅनो मोर्चा होता अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला महाविकास आघाडीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी नॅनो मोर्चा अशी टीका केली होती मात्र हा मोर्चा नॅनो मोर्चा नव्हता तर हा मोर्चा देवेंद्र फडणवीस यांच्याएवढा हा मोर्चा होता अशी खोचक टीका केली. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाने ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, कुणाच्या अंगावर, रंगावरून तर कुणाच्या व्यंगावरून अशी टीका करु नयें. काल उद्धव ठाकरे यांची पातळी घसरलेली दिसली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अंगावरून केलेली टीका ही चुकीची होती. त्यासंदर्भात त्यांनी ट्विटही केले आहे अशी टीका त्यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चावर नॅनो मोर्चा अशी टीका केली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी नॅनो मोर्चा म्हणूनही या मोर्चाची खिल्ली उडवली होती.
त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका करताना हा मोर्चा देवेंद्र फडणवीस यांच्याएवढा होता अशी टीका केली. त्यामुळे शिंदे गटाने त्यांच्यावर निशाणा साधला.
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची पातळी घसरली होती. त्यामुळे टीका करताना कुणाच्याही व्यंग्यावर अथवा अंगावर करू नका अशी त्यांनी मागणीही केली.