मला कुणी तरी संविधान भेट म्हणून दिलं. हे संविधान ज्यावर आपला देश चालतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 400 पार कशाला करायचे आहेत. संविधान बदलायला का? एका दलित कुटुंबात जन्मलेल्या महामानवाने हे संविधान लिहिलं आहे. म्हणून त्यांना ते बदलायचं आहे. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान यांना पचत नाही. पटत नाही, हे यांचं गोमूत्रधारी हिंदुत्व, म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं नाव घेताना हिंदूहृदयसम्राट घ्यायला जीभ कचरते का म्हणत मोदींवर टीका केली.
ओमराजेंना मत म्हणजे मला मत. प्रज्वल रेवन्ना यांचे अनेक व्हिडीओ आले आहेत. तरीही तुम्ही म्हणता मला मत द्या. बाळासाहेबांचं कर्ज आहे म्हणता. नुसतं बाळासाहेब म्हणून नका, हिंदूहृदयस्रमाट म्हणा. हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ का कचरते. तुम्ही बाळासाहेबांचे विचार मानता. मग अमित शाह यांनी शब्द का मोडला? मी आईवडिलांची शपथ घेतली आणि तुळजाभवानीची शपथ घेत तुम्हाला सांगितल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयोगाला म्हणावं काय कारवाई करायची ती करा. मी जय भवानी जय शिवाजी म्हणायचं सोडणार नाही. निवडणूक आयोगाने शिवसेनेवर कारवाई करायचं ठरवलं तर काय कारवाई करायची हे याद राखा. ते मी बघून घेईल. तुळजा भवानीच्या साक्षीने सांगतो. आमचं सरकार येत आहे, मोदी कधी तरी तुमच्या जिल्ह्यात आले होते का. महाराष्ट्रात कधी एवढ्या सभा घेतल्या होत्या का? आता गल्लीबोळात जात आहेत म्ही महाराष्ट्र जिंकू शकत नाही म्हणत ठाकरेंनी भाजपसह मोदींवर टीका केली.
अमित शाह तुमच्या लाज असेल हिंमत तर नाही. तर जनतेच्या प्रश्नावर बोला. धाराशीवला कधी देणार पाणी. मोदीजी तुम्ही तुमच्या दहा वर्षातील कामे जनतेसमोर ठेवा. मी अडीच वर्षातील कामे ठेवतो. तुम्ही जिंकला तर मी घरी बसणार. ईडी कारवाया करून ज्यांनी आमच्या लोकांना सतावलं. त्याचा हिशोब व्याजासह परत केल्याशिवाय राहणार नसल्याचं म्हणत ठाकरेंनी शाहांवरही कडाडून टीका केली.