भाजपला हरवू शकतो हे महाविकास आघाडीने राज्यात दाखवून दिले. महाविकास आघाडीत सध्या अभुतपूर्व उत्साह आहे. महाविकास आघाडी आता देशभरात मोठा प्रयोग राबविण्याच्या तयारीत आहे. लोकसभेतील यशाची मालिका खंडीत होऊ नये यासाठी मोठी खलबतं सुरु आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांची चर्चेची प्राथमिक फेरी पार पडली. त्यानंतर तिन पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येत पत्रकार परिषद घेतली. यात उद्धव ठाकरे यांनी काही पत्ते उघड केले.
इतर राज्यात ही दाखवणार ताकद
जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं तेव्हा आमची बैठक झाली आहेत. विधानसभेत सर्वांना सोबत घेणार. इतर घटक पक्षांना सोबत घेणार. राज्यात विधानसभा होणार आहे. इतर राज्यातही विधानसभा आहे. त्यामुळे तिथेही आपल्याला ताकद लावायची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. विजयामुळे महाविकास आघाडीचा उत्साह दुणावला आहे. आता त्यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांवर पण लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी सर्वांचीच मदत घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
नॅरेटिव्ह तर त्यांनीच सेट केला
विरोधकांनी जनतेत चुकीचा संदेश दिला. एक नॅरेटिव्ह सेट केला म्हणून भाजपला फटका बसल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी तडक उत्तर दिले. त्यांच्याच लोकांनी सांगितलं संविधान बदलणार आहे. त्यांनीच हा नरेटिव्ह सेट केला होता. अच्छे दिनाच्या नरेटिव्हचं काय झालं. १५ लाखाचं काय झालं. २०१४ पर्यंतच्या गोष्टी काढल्या तर नरेटिव्ह कुणी सेट केलं, असा हल्लाबोल त्यांनी महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर केला.
आता निकालाची अपेक्षा
शिवसेना कुणाची या मुद्याकडे उद्धव ठाकरे यांनी मोर्चा वळवला. सर्वोच्च न्यायालयाची सुट्टी संपली आहे. आम्ही निकालाची अपेक्षा करतो. पण जनतेच्या न्यायालयात काय झालं हे जगाने पाहिलं, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची उद्धव सेना वाट पाहत आहे.