मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे राज्यातील विविध घटकांकडून समस्या मांडणे सुरुच आहे. आज उमेद संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांनी उमेद संस्थेविषयी राज्य सरकारच्या खासगीरकरणाच्या धोरणाबद्दल समस्या मांडल्या. राज ठाकरेंनी यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली. (UMED employee meets MNS Chief Raj Thackeray for their issues)
केंद्र सरकारचे जीवनोन्नती अभियान महाराष्ट्रात उमेद संस्थेतर्फे राबवले जाते. उमेद संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेत “खासगी संस्थेकडे वर्ग करण्याचा घाट राज्य सरकारकडून घातला जात असल्याचे सांगितले”. उमेद संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधत चर्चा केली.
केंद्र सरकारचं जीवनोन्नती अभियान राबवणाऱ्या उमेद संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी ‘आम्हाला खासगी संस्थेकडे वर्ग करण्याचा घाट राज्यसरकारतर्फे घातला जातोय’ म्हणत राजसाहेबांची भेट घेतली. ह्याप्रश्नी राजसाहेबांनी ग्रामविकासमंत्री श्री. हसन मुश्रीफ ह्यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. pic.twitter.com/mIWV9AABLT
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 3, 2020
२०११ पासून महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदची (एमएसआरएलएम) अंमलबजावणी होत आहे. याकरिता शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. मात्र, उमेद बाह्य संस्थेला देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत राज्यात सर्वत्र बचतगटांच्या महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. उमेद संस्थेच्या खासगीकरणा विरोधात राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर बचतगटांच्या महिलांनी मोर्चा काढला होता.
राज्यात ४ लाख ७९ हजार १७४ समूह स्थापन करण्यात आले असून यामध्ये ४९ लाख ४४ हजार ६५६ कुटुंब या कर्मचाऱ्यांनी जोडलेली आहेत. मात्र, कोणतेही पूर्व सूचना न देता अचानक अनेक जिल्ह्यातील वेगवेगळ्या पदावर कार्यरत कर्मचारी यांच्या सेवा शासनाने अन्यायकारक पद्धतीने समाप्त केल्या गेल्याने अभियानाचे खासगीकरण होत असल्याचा आरोप झाला होता.
उमेद बंद होणार नाही. केवळ कर्मचाऱ्यांचे पगार हे दुसऱ्या संस्थेमार्फत काढले जातील. शिवाय, ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं कंत्राट नव्यानं केलेले नाही अशांची यादी तयार केली असून त्यांचे पगार आणि कंत्राट देखील पुन्हा केले जाईल, अशी माहिती रत्नागिरी येथे उदय सामंत यांनी दिली होती.
दरम्यान, अकरावी प्रवेशाच्या मुद्द्यांसंदर्भात पालक संघटनांनी सोमवारी राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान राज ठाकरेंनी वर्षा गायकवाड यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती.
संबंधित बातम्या :
इयत्ता अकरावीचा प्रश्न उद्यापर्यंत सुटणार?; राज ठाकरेंचा थेट वर्षा गायकवाडांना फोन
Raj Thackeray | कोचिंग क्लासचे मालक राज ठाकरेंची भेट घेणार
(UMED employee meets MNS Chief Raj Thackeray for their issues)