सत्तेत येण्यासाठी भाजपने बेरोजगारांच्या भावनांशी खेळ केला; मोदी सरकारने 99 टक्के नोकरीचे अर्ज नाकारले; महेश तपासेंची टीका

| Updated on: Jul 28, 2022 | 5:48 PM

मुंबई: देशातील तरुणांना रोजगाराच्या  मोठ्या संधी देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सत्तेवर आले मात्र सत्तेत येण्यासाठी भाजपने बेरोजगारांच्या भावनांशी खेळ केला असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केला आहे. दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन पूर्ण न केल्याने महेश तपासे यांनी मोदी सरकारवर […]

सत्तेत येण्यासाठी भाजपने बेरोजगारांच्या भावनांशी खेळ केला; मोदी सरकारने 99 टक्के नोकरीचे अर्ज नाकारले; महेश तपासेंची टीका
Follow us on

मुंबई: देशातील तरुणांना रोजगाराच्या  मोठ्या संधी देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सत्तेवर आले मात्र सत्तेत येण्यासाठी भाजपने बेरोजगारांच्या भावनांशी खेळ केला असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केला आहे. दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन पूर्ण न केल्याने महेश तपासे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने लोकसभेमध्ये 2014 पासून सरकारी नोकऱ्यांसाठी 22 कोटी अर्ज प्राप्त झाल्याची कबुली दिली.

 

मात्र, केवळ 7 लाख 22 हजार अर्जांचा विचार करण्यात आला म्हणजे सुमारे 99 टक्के अर्ज फेटाळण्यात आले आणि एकूण अर्जदारांपैकी केवळ 0.32 टक्के अर्जदारांनाच नोकरी मिळाली असेही महेश तपासे म्हणाले.

अयशस्वी धोरणांमुळे बेरोजगारी

देशातील तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान मोदी सत्तेवर आले. पण वास्तव समजण्यापासून दूर आहे. अयशस्वी धोरणांमुळे बेरोजगारी आज सर्वोच्च पातळीवर आहे, परंतु मोदी सरकार केवळ द्वेष आणि फूटीचे राजकारण करत आहे आणि त्यामुळे समावेशक आणि विकासाच्या मुद्यांसाठी त्यांना वेळ नाही अशी टीकाही महेश तपासे यांनी केली.

देशातील बेरोजगारी वाढली

भाजपकडून राजकारणासाठी देशातील युवकांचा गैरवापर केला जात आहे, मात्र त्यांच्या रोजगारचा प्रश्न मोदी सरकारकडून सोडवला जात नसल्याने भारतात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. मोदी सरकार आल्यापासून युवकांना फक्त अश्वासनांपलिकडे काहीच मिळत नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांंची मोठी संख्या वाढली असल्याची टीकाही महेश तपासे यांनी केली.