गृहमंत्री अमित शाह लालबाग राजाच्या चरणी लीन, सपत्नीक घेतलं दर्शन

| Updated on: Sep 09, 2024 | 12:51 PM

गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतंच लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

गृहमंत्री अमित शाह लालबाग राजाच्या चरणी लीन, सपत्नीक घेतलं दर्शन
Follow us on

Amit Shah Visit Lalbag Raja : सध्या मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. मुंबईतील लालबाग परिसरात असलेला लालबागचा राजा हा जगभरात प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा राजा अशी लालबागचा राजाची ख्याती आहे. लाखो भाविक लालबागच्या राजाचे दर्शन करण्यासाठी येत असतात. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारही उपस्थित होते.

अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी मुंबई दौऱ्यानिमित्त आलेल्या अमित शाह यांनी आज सोमवारी ९ सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांची पत्नीही उपस्थित होती.

अमित शाह साधारण सकाळी ११.५५ च्या दरम्यान लालबागचा राजाच्या दर्शनासाठी आले. यावेळी त्यांनी गणरायांच्या मूर्तीला हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी बाप्पााला नारळाचे तोरण अर्पण केले. तसेच त्याच्या चरणावर हळद, कुंकू आणि फुलंही वाहिली. यानंतर अमित शाह यांनी बाप्पााच्या चरणावर डोकं ठेवत आशीर्वाद मागितला.

अमित शाहांच्या आधी शरद पवारांनी घेतले दर्शन

गेल्यावर्षीही अमित शाह यांनी सहकुटुंब लालबाग राजाचे दर्शन घेतले होते. लालबागचा राजाला दाखल होण्यापूर्वी अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट दिली होती. यावेळी त्यांनी लाडक्या गणरायाचे दर्शन घेतले. त्यासोबत अमित शाहांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील निवासस्थानी असलेल्या गणपतीचे दर्शन घेतले. याआधी शरद पवारांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते.

अमित शाह पुन्हा दिल्लीकडे होणार रवाना

यानंतर अमित शाह हे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्य्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देणार आहे. यानंतर साधारण दीड वाजताच्या सुमारास अमित शाह पुन्हा दिल्लीकडे रवाना होतील. आगमी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाहा यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता.

दरम्यान अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त संपूर्ण वाळकेश्वर परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती. तसेच संपूर्ण परिसरात तगडा बंदोबस्तही पाहायला मिळाला होता. यामुळे वाळकेश्र्वर परिसराला एखाद्या छावणीचे स्वरूप प्राप्त झालं होतं