मुंबई : राज्याच्या राजकारणासह देशाच्या राजकारणातही आजच्या शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर खळबळ उडाली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसह मित्र पक्षांमधूनही शरद पवार यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्यांनी निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आता त्यांच्या पक्षासह मित्र पक्ष आणि शरद पवार यांच्या राजकीय विरोधक असलेले मात्र मित्र असलेले अनेक नेत्यांनीही त्यांच्या या निर्णयाचा धक्का बसला असून त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार हेच हवेत असे ट्विट करत त्यांनीही शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा असे ट्विट केले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर ट्विट करत शरद पवार तुम्ही राजकारणामध्ये जसे हवे आहात तसेच तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदीही हवे आहात अशी इच्छा त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
नारायण राणे भाजपचे नेते असले आणि केंद्रीय मंत्री असले तरी त्यांनी बोलतान अनेकदा शरद पवार यांचे राजकीय नेतृत्व मान्य केले आहे. त्यामुळे त्यांनी आताही त्यांच्या या निर्णयानंतर आपल्या मनातील भावना त्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
माननीय शरद पवार साहेब, आपण राजकारणातही हवेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुध्दा हवेत !@PawarSpeaks
— Narayan Rane (@MeNarayanRane) May 2, 2023
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता आंदोलनाची जय्यत तयारी केली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना घरी जाण्याचे आवाहन केले आहे.
त्यामुळे राजकीय विरोधक म्हणून असले तरी नारायण राणे यांनी शरद पवार यांना विनंती करत तुम्ही राजकारणातही आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदीही हवे आहात असं म्हटले आहे.