मुंबईः अभिनेत्री उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा वाद दिवसेंदिवस आणखी चिघळताना दिसत आहे. या दोघींचा वाद कधी पोलीस स्टेशनला जातो आहे तर कधी महिला आयोगाकडे जात आहे. त्यामुळे या वादाचा नेमका शेवट कसा होणार आणि या वादात नेमकं आता कोण बाजी मारणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
चित्रा वाघ यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार अभिनेत्री उर्फी जावेदने महिला आयोगाकडे केली आहे.
तर त्यातच उर्फी जावेद ही मुस्लीम असल्याने तिच्यावर बंधनं घातली जात असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. त्यामुळे आ्रता या वादात आता तृप्ती देसाई यांनी उडी घेतल्याने हा वादाला आता विचित्र वळण लागले आहे.
उर्फी जावेद हिने महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर त्याविषयी बोलताना भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना सांगितले की मी तिला जीवे मारण्याची धमकी कशाला देऊ. असा त्यांनी प्रतिसवाल केला आहे. तिला धमकी नाही तर तिला उघडी नागडी फिरू नको असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेदच्या अंगप्रदर्शनामुळे भजापच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार आवाज उठविला होता.
त्यामुळे उर्फी जावेद आपला नंगानाच थांबवत नाही तोपर्यंत हा वाद चालूच राहणार असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले आहे.
तर दुसरीकडे अभिनेत्री उर्फी जावेदने आपल्याला चित्रा वाघ यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी चिघळण्याची शक्यता दिसून येत आहे.