मुंबईः चित्रा वाघ यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार अभिनेत्री उर्फी जावेदने महिला आयोगाकडे केली आहे. त्यामुळे उर्फी जावेद आणि चित्रा वाघ हे प्रकरण पुन्हा एकदा तापले आहे. उर्फी जावेद हिने महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर त्याविषयी बोलताना भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना सांगितले मी तिला जीवे मारण्याची धमकी कशाला देऊ.
तिला धमकी नाही तर तिला उघडी नागडी फिरू नको असा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे तिला धमकी नाही तर थेट इशाराच दिला असल्याचे मत चित्रा वाघ यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेदच्या अंगप्रदर्शनामुळे भजापच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार आवाज उठविला होता. त्यामुळे हा वाद आता महिला आयोगाकडेही गेला आहे.
तर दुसरीकडे अभिनेत्री उर्फी जावेदने आपल्याला चित्रा वाघ यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार महिला आयोगाकडे उर्फीने तक्रार केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी चिघळण्याची शक्यता दिसून येत आहे.
उर्फी जावेदने महिला आयोगाकडे आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार दिल्यानंतर त्यावर स्पष्टीकरण देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, मला धमकी वगैरे काही माहिती नाही मात्र तिला थेट इशारा दिला आहे की, तू रस्त्यावर उघडी नागडी फिरू नको.
आमचा तिच्या पेशाविषयी किंवा अंगप्रदर्शनाविषयी विरोध नाही तर ती ज्या प्रकारे रस्त्यावर फिरत आहे. त्याला आमचा विरोध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
उर्फी जावेदला मी जीवे मारण्याची धमकी कशाला देऊ अशी बाजू स्पष्ट करत भाजपच्या चित्रा वाघ यांनी सांगितले की, आमचा विरोध रस्त्यावर उघडं नागडं फिरण्याला आहे.
त्यामुळे तिने काय फॅशन करायची आहे ती तिने चित्रपट आणि तिच्या क्षेत्रात करावी. मात्र रस्त्यावर अशा पद्धतीने फिरू नये असंही, रस्त्यावर तिच्या उघडंनागडं फिरण्याला आमचा विरोध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून जो उर्फी जावेदने नंगटपणा चालू केला आहे. त्याला आमचा विरोध असल्याचे सांगत अशा लोकांसाठी भाजपमध्ये थारा नाही. त्यामुळे आम्ही तिला धमकी नाही थेट इशारा दिला असल्याचा त्यांना सांगितले.