मुंबई : अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना उपयोगी वस्तू आणि लहान मुलांना खाऊ वाटप केलं. विलेपार्ले इथे उर्मिला मातोंडकर यांनी स्वत: उपस्थिती लावून, चिमुकल्यांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. शरजील उस्मानीने केलेलं विधान, शेतकरी आंदोलन, राज्य आणि केंद्र सरकारमधील वाद या सर्वांवर रोखठोक मतं मांडली. (Urmila Matondkar speaks on Delhi Farmer protest, Sharjeel Usmani, Hindu )
परमेश्वराने आपल्याला जे जे दिले त्यातील थोडा हिस्सा समाजउपयोगी यावा, तसेच जे जे आपल्यासाठी आपण करतो ते दुसऱ्यंसाठीही करावं, या उद्देशाने गरजू महिलांसोबत वाढदिवस साजरा केला असं उर्मिलांनी सांगितलं.
“शिवसैनिक आणि महिला रणरागिणी हीच शिवसेनेची सर्वात मोठी शक्ती आहे. बाळासाहेब नेहमी म्हणायचे, शिवसैनिक आहेत म्हणून आम्ही आहोत. त्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रकरिता आम्ही सगळेच विकासाकरिता बौद्धिक दृष्ट्या विकासाची वाटचाल कायम ठेवू”
“शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे. आज जर शेतकरीच खुश नसेल, त्यांच्याविरोधातील कायदे आणले असतील, तर याकरिता विचार केला पाहिजे. शेतकरी आंदोलनात 50-60 लोकांचा जीव गेला आहे. ते थंडीत बसले आहेत. त्यांना देशद्रोही खलिस्तानी अशी नावं ठेवून विटंबना केली जात आहे. त्यांचा अपमान केला जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी देशासाठी सर्वकाही दिलं आहे, त्या शेतकऱ्यांच्या मागण्या आपण समजू शकतो. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होवोत यावर काहीतरी उपाय निघावा”, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.
“मुळात शब्द हे जपून वापरावे लागतात, त्यामुळे मला असं वाटतं की शरजील नावाच्या इसमाने पुण्यामध्ये हिंदू धर्माच्याविरोधात जे काही शब्द वापरले, ते चुकीचे आणि दुर्दैवी होते. त्याबाबत पोलीस तपास जरुर व्हायला पाहिजे”, असं उर्मिलांनी नमूद केलं.
महाराष्ट्रात मोघलाई आहे, असं विरोधक म्हणत आहेत. त्यावर उर्मिला म्हणाल्या, “मुघलराज वगैरे असे काही शब्द केवळ महाराष्ट्र शासनापुरतंच जपून ठेवले आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. असे शब्द इथे वापरले तर केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत काय शब्द वापरणार? आज एव्हढे शेतकरी आंदोलनाला बसले आहेत लोकांचे जीव गेले आहेत त्याच्यावरही काही शब्द बोलायला हवं”,
केवळ महाराष्ट्र सरकारची हेटाळणी आणि महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी जर शब्द वापरले तर महाराष्ट्राची जनता हुशार आहे. महाराष्ट्राच्या जनतेला समजते. हे केवळ महाराष्ट्राला घालून पाडून बोलण्यासाठी हे शब्द वापरले जात आहेत, असंही उर्मिलांनी ठणकावलं.
VIDEO :
Urmila Matondkar B’day | उर्मिला मातोंडकरच्या करिअरवर जेव्हा राम गोपाल वर्मामुळे टाच आली
VIDEO: दिंडोशीत क्रिकेटचा राजकीय डाव रंगला, आमदार सुनील प्रभूंच्या गोलंदाजीवर उर्मिलाची फटकेबाजी
(Urmila Matondkar speaks on Delhi Farmer protest, Sharjeel Usmani, Hindu )