वंदेभारतला आता बोरीवलीला थांबा, रेल्वेराज्यमंत्र्याचे ट्वीट

| Updated on: Jan 14, 2023 | 8:35 PM

मुंबई सेंट्रल ते गांधीनगर सेमी हायस्पीड वंदेभारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेनला आता नवा थांबा देण्यात आल्याने तिच्या वेळापत्रकात लवरकच बदल होणार आहे. नेमका काय होणार बदल पाहूयात

वंदेभारतला आता बोरीवलीला थांबा, रेल्वेराज्यमंत्र्याचे ट्वीट
vande-bharat1
Image Credit source: vande-bharat1
Follow us on

मुंबई : मुंबई सेंट्रल ते गांधीनगर धावणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. या वंदेभारत ट्रेनला आता बोरीवलीला ही थांबा देण्यात येणार असल्याचे ट्वीट रेल्वेराज्यमंत्री कल्पना जरदोश यांनी केले आहे. त्यामुळे बोरीवली राहणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. या सेमीफास्ट ट्रेनला मोजकेच थांबे आहेत. या ट्रेनच्या वेळापत्रकात त्यामुळे बदलही करावा लागणार आहे. या ट्रेनच्या वेगावर त्यामुळे परीणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई सेंट्रल ते गांधीनगर धावणाऱ्या वंदेभारत एक्स्प्रेसला आता बोरीवलीला थांबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे रेल्वेराज्यमंत्री कल्पना जरदोश यांनी ट्वीट केले आहे. ही ट्रेन मुंबई सेंट्रलहून थेट वापीला थांबा घेत असल्याने बोरीवलीला राहणाऱ्या प्रवाशांना मुंबई सेंट्रलला येण्यावाचून पर्याय नव्हता. त्यामुळे बोरीवलीच्या प्रवाशांसाठी हा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन सेमी फास्ट असल्याने या ट्रेनला मोजके थांबे ठेवले होते. आता बोरीवलीला थांबा दिल्याने तिच्या सुटण्याच्या वेळात बदल होणार आहे. ही ट्रेन आता बुधवार ऐवजी आठवड्याचे सर्व दिवस धावणार आहे. सध्या ही ट्रेन रविवार वगळता सर्व दिवस धावत होती. आता नव्या निर्णयानूसार बुधवार वगळून रविवार ते शनिवार धावणार असल्याचेही रेल्वेराज्य मंत्री कल्पना जरदोश यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

मुंबई सेंट्रल ते गांधीनगर सेमी हायस्पीड वंदेभारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंदेभारत ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन मानली जात असून तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. वंदेभारत वाराणसी ते दिल्ली, दिल्ली ते काटरा, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, दिल्ली ते चंदीगड, चेन्नई ते म्हैसूर , बिलासपूर ते नागपूर आदी आठ वंदेभारत सध्या देशात धावत आहेत.