वसईत दे दणादण! नवरा-बायकोच्या कुटुंबीयांची फ्री-स्टाईल हाणामारी

| Updated on: Feb 25, 2020 | 9:34 AM

कौटुंबिक वादातून माहेरी राहायला आलेल्या पत्नीला सासरच्या मंडळींनी तिच्याच घरी जाऊन मारहाण केल्याचा आरोप आहे

वसईत दे दणादण! नवरा-बायकोच्या कुटुंबीयांची फ्री-स्टाईल हाणामारी
Follow us on

वसई : भांडल्यानंतर एकमेकांपासून विभक्त राहणाऱ्या पती-पत्नीच्या कुटुंबियांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. वसईतील भरवस्तीत घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Vasai Husband Wife Family Fight)

वसई पश्चिमेकडे ‘डीमार्ट’जवळ असलेल्या पेरियार सोसायटीत सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. सुप्रिया जैस्वाल पतीसोबत झालेल्या कौटुंबिक वादामुळे आपल्या आई वडिलांकडे राहत होत्या.

सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास सुप्रिया यांचे पती आणि त्यांच्या सासरकडील मंडळी तिच्या वडिलांच्या घरी आले. त्यानंतर सुप्रिया आणि त्यांच्या भावांना सासरच्या व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

सुप्रिया यांच्यासह त्यांचे दोन भाऊ हाणामारीत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वसईच्या गोल्डनपार्क हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

घरात घुसून ही मारामारी होतानाचा सर्व प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेने काहीवेळ सोसायटीच्या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. (Vasai Husband Wife Family Fight)

पाहा व्हिडीओ