Vasai Rain : सनसिटी गास रोड अजूनही पाण्यात, निचरा होण्यासाठी 8 दिवस लागण्याची शक्यता

| Updated on: Jul 20, 2021 | 11:03 AM

वसईच्या सनसिटी गास रोडवर (vasai suncity gass road) सलग तिसऱ्या दिवशीही जवळपास तीन फूट पाणी (vasai rain) आहे. या साचलेल्या पाण्यात चक्क एक भलीमोठी बस बंद पडल्याने अडकून पडली आहे.

Vasai Rain : सनसिटी गास रोड अजूनही पाण्यात, निचरा होण्यासाठी 8 दिवस लागण्याची शक्यता
Vasai rain suncity gass road 1
Follow us on

वसई : वसईच्या सनसिटी गास रोडवर (vasai suncity gass road) सलग तिसऱ्या दिवशीही जवळपास तीन फूट पाणी (vasai rain) आहे. या साचलेल्या पाण्यात चक्क एक भलीमोठी बस बंद पडल्याने अडकून पडली आहे. दोनच दिवसापूर्वी एक एक्सयूव्ही कार देखील पाण्यात अडकली होती. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला दोरी आणि ट्रॅक्‍टरच्या साह्याने बाहेर काढली होती. मात्र आता ही बस रस्त्याच्या मधोमध फसली आहे.

वास्तविक पाहता महानगरपालिकेने आणि माणिकपूर पोलिसांनी हा रस्ता सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद केला पाहिजे. कोणीही या रस्त्याकडे लक्ष देत नाही. मात्र आज जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी गास रोड वरील हे पाणी उतरण्यासाठी पुढचे आठ दिवस लागण्याची शक्यता आहे. प्रशासन कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.

Vasai rain suncity gass road 1

मध्यरात्रीनंतर पावसाची विश्रांती

वसई, विरार, नालासोपाऱ्यात मध्यरात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आज सकाळच्या वेळेत शहरातील सर्व व्यवहार, लोकल सेवा, सुरळीत सुरू झाल्या. सकल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा होत आहे. मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचारा साचला आहे. वसई विरार महापालिकेचे स्वच्छता दूत सकाळपासूनच कचरा उचलत आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने काल सायंकाळच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वसई हद्दीत वासमारे ब्रिज, लोढा धाम परिसरात मुख्य रस्त्यावरील मुंबई लेनवर गुढघा ते कंबरेपर्यंत पाणी साचले होते. महामार्गानजीकच्या डोंगराचे पाणी रस्त्यावर आल्याने, आणि त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने हे पाणी साचले होते. पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली असतानाही, आयआरबीची यंत्रणा मात्र याकडे फिरकलीही नाही.

VIDEO : वसई सनसिटी गास रोडवर बस अडकली 

संबंधित बातम्या  

बीएमसीच्या पार्किंगमध्ये साचलेलं 20 फूट पाणी ओसरलं, 450 गाड्या नादुरुस्त, वाहनचालकांचा संताप